लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेडकडून नियमांची पायमल्ली,ना अग्निशमन यंत्रणा ना ॲम्बुलन्स


चंद्रपूर : मागील आठवड्यात नगरपरिषद घुग्घुसच्या अग्निशमन वाहनाचा वापर लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड घुग्घुस द्वारा कोळश्याची आग विझविण्यासाठी होत होता. मागील कित्येक वर्षांपासून या कंपनीद्वारा वारंवार नियमांचे सतत उल्लंघन होत असून, जिल्हा औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाने या कंपनीवर 5 कोटी दंड ठोठावा व ती रकम घुग्घुस येथील नागरिकांच्या आरोग्यासाठी खर्च करावा, अशी मागणी आम आदमी पार्टी चे घुग्गुस शहराध्यक्ष इंजी.अमीत बोरकर
यांनी केली आहे. तसेच या प्रकरनाची उच्च चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांनी सांगितले की, नगर नगरपरिषद घुग्घुसच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी अग्निशमन वाहनाचा लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेडला वापर करण्याची परवानगी दिली व कोणत्या नियमानुसार दिली ?, याचा खुलासा होण्याची गरज आहे. या कंपनीकडे स्वतःची अग्निशमन यंत्रणा नाही, हे यावरून स्पष्ट होत असून, औद्योगिक सुरक्षा कायद्याचे उल्लंघन होत आहे.

घुग्घुस प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर नो पार्किंग एरियामध्ये या कंपनीच्या वाहनांची पार्किंग सतत अवैधरित्या सुरु आहे. गरोदर माता व नवजात शिशुंच्या आरोग्यास जास्त धोका निर्माण होत असताना दुर्लक्ष होत आहे. सदर कंपनीकडे स्वतःच्या मालकीची ॲम्बुलन्स सुद्धा नाही अशीही तक्रार नागरिकांनी आम आदमी पक्षाकडे केली.

कंपणीद्वारे दररोज मोठ्या प्रमाणात धूर सोडली जाते. परिणामस्वरूपी सभोवतालच्या शेतीवर त्याचा हानिकारक परिणाम वाढत आहे. तसेच शेतमालाचे नुकसान दिवसेंदिवस वाढत आहे व उत्पादकता दिवसेंदिवस मंदावत आहे, असे असतानाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष करीत आहे.
कंपनीला नियमानुसार दिलेला मार्गाचा वापर न करता मागील कित्येक वर्षांपासून या कँपणीद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्राबाजूने अवैध पद्धतीने कंपनीची वाहतूक सुरूच आहे यावर शासन प्रशासना डोळे झाकून बसलेलं आहे.
येत्या सात दिवसांत समस्या सोडविल्या नाहीतर आम आदमी पार्टी तर्फे नागरिक तसेच कामगारांना सोबत घेऊन कंपनीला ताला ठोको आंदोलन करन्यात येईल .असा ईशारा आप तर्फे पत्रकार परिषदे मार्फत देन्यात आला .
यावेळी आपचे जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी,महिला अध्यक्षा एडवोकेट सुनिता ताई पाटील युवा जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार,शहर सचिव राजू कुडे, संतोष बोपचे,महिला सचिव आरती आगलावे, महिला उपाध्यक्ष रुपा काटकर, महिला उपाध्यक्ष जसमीन शेख,घुग्घुस शहर अध्यक्ष अमित बोरकर,शहर उपाध्यक्ष अभिषेक सपडी,सहसचिव विकास खाडे, सचिव संदीप पथाडे, , सह संघटनमंत्री आशिष पाझारे, रवी शांतलावार, प्रशांत सेनानी, प्रफुल पाझारे, निखिल कामतवार, अनुप धणविजय, अनुप नळे, करण बिऱ्हाडे, संतोष सलामे, प्रशांत पाझारे, कुलदीप पाटील, महिला शहर अध्यक्ष उमा तोकलवार, महिला उपाध्यक्ष सोनम शेख, महिला सचिव विपश्यना धनविजय, महिला कोषाध्यक्ष अंजली नगराळे, महिला संघटनमंत्री पुनम वर्मा, रिना पेरपूल्ला, शामला तराला, धम्मदिना नायडू, नईमा शेख, कविता विष्णु भक्त, शोभाताई इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

                     राजेश चेडगुलवर

आम आदमी पार्टी, चंद्रपूर जिल्हा, महानगर सोशल मीडिया प्रमुख

आदरणीय संपादकजी,
उपरोक्त बातमी आपण आपल्या दैनिकात, लाईव्ह चॅनेलवर, सोशल मीडिया चॅनेल वर, गूगल चॅनेलवर प्रसारित कराल अशी अपेक्षा.

धन्यवाद !