शेती हंगामाच्या तोंडावर कृषी विभागात शुकशुकाट बंद दरवाजाला हार घालून चिटकवून दिले निवेदन, मनसे द्वारे निषेध

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

ऐन हंगामाच्या तोंडावर राळेगाव तालुक्यातील कृषी विभाग वाऱ्यावर सोडून अधिकारी कर्मचारी नदारद झाल्याची घटना ( दि.३१.०५.२०२२ ) रोजी निदर्शनास आली. मनसे तालुकाध्यक्ष शंकर वरघट हे पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांच्या समस्याबाबत निवेदन घेऊन कृषी विभागात गेलें असता कार्यालयीन वेळेत कृषी विभागात कुणीही उपस्थित नव्हते. एव्हढेच नव्हे तर कृषी कार्यालयाचे दार देखील बाहेरून कडी लावून बंद होते. या घटनेचा तीव्र निषेध करीत मनसे द्वारे कृषी कार्यालयाच्या बंद दरवाजाला हार घालून दारालाच निवेदन चिटकवण्यात आले.
राळेगाव तालुक्यात बोगस बियाणे खता ची विक्री बाबत कारवाई करावी या करीता मनसे द्वारे कृषी विभागाला निवेदन देण्यात येणार होते. या करीता पदाधिकारीकृषी विभागात गेलें असता हा प्रकार निदर्शनास आला. यावेळी मनविसे तालुका अध्यक्ष शैलेश आडे, जगदिश गोबाडे, गिरीश कुंभारकर उपस्थित होते.

   

प्रतिक्रिया….
शेतकऱ्याची फसवणूक सहन करणारं नाही. बोगस बियाणे, खते राळेगाव तालुक्यात येतं असल्याच्या तक्रारी आमच्याकडे येतं आहे. या बाबत कृषी विभागाला निवेदन देण्यास गेलो असता तिथे शुकशुकाट होता. कुणीही हजर नव्हते. ही बाब संतापजनक आहे. कुणी हजरच राहात नसेल तर हा बिन कामाचा पांढरा हत्ती पोसायचा कशाला. कृषी विभाग बंद करा. आम्ही याची तक्रार वरिष्ठाना करू. कृषी विभाग कारवाई करणारं नसेल तर मनसे आपल्या स्टाईल ने बोगस धंदे करणार्यांना धडा शिकवेल. यंदा हवामान खात्याने मान्सून लवकर येणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. वातावरण तयार झाले आहे. शेतकर्यांची लगबग वाढली आहे. अशा वेळी जर तुम्ही शेतकऱ्यांच्या हक्का प्रति जागरूक नसाल तर तुम्ही असले काय नसले काय काही फरक पडत नाही. बियाण्यात एकदा फसवणूक झाली कीं पूर्ण हंगाम वाया जातो.

    -शंकर वरघट 

मनसे तालुकाध्यक्ष राळेगाव