ऑनलाईन शिक्षणात अडचण मोबाईल रेंज सातत्याने गुल ( विद्यार्थ्यांसह पालकांतून व्यक्त होतोय संताप)


राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225)


कोरोनाच्या संकटाने ऑनलाईन शिक्षण सुरू आहे मात्र शहरासह तालुक्यात सातत्याने मोबाईलची रेंज गुल होत असल्याने ऑनलाइन शिक्षणात व्यत्यय येत आहे परिणामी शिक्षक पालक विद्यार्थ्यांतून संताप व्यक्त होत आहे रेंजसाठी उंचीवरच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जावे लागत आहे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुले शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर राहू नयेत म्हणून ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे नर्सरी पासून ते उच्च शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे मोबाईल संगणकावरून शिक्षण देण्यात येत आहेत शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील मुले शिक्षण घेत आहेत शाळेतील शिक्षकांनी व्हाट्सअप ग्रुप तयार करून त्यावर अभ्यास देताहेत मुलांनी केलेल्या अभ्यासाची ही तपासणी केली जात आहे कोरोनामुळे शाळा जरी ऑफलाइन असल्या तरी विद्यार्थी मात्र ऑनलाइन अभ्यासात व्यस्त आहेत मात्र शहरासह ग्रामीण भागात सातत्याने मोबाईलची रेंज गुल होत आहे त्यामुळे शिक्षणात व्यत्यय येत आहे शासनाने डिजिटल इंडिया च्या माध्यमातून ग्रामपंचायत कार्यालय अंगणवाड्यांना इंटरनेट सेवा जोडून विविध योजना राबवित आहेत परंतु येथे मोबाईला पुरेशी रेंज राहत नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणीस सामोरे जावे लागत आहे विशेष म्हणजे मोबाईलवर कॉल केला तरी व्यवस्थित रेंज मिळत नाही त्यामुळे सातत्याने संवाद तुटत आहे त्यामुळे मोबाईल धारकातून नाराजी व्यक्त होत असल्याचे दिसत आहे