शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांचे सक्षमीकरण प्रशिक्षण धानोरा येथे संपन्न

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांचे सक्षमीकरण प्रशिक्षण घेण्यात आले.
विद्यार्थी यांच्या सर्वांगीण विकास करायचा असेल तर स्थानिक लोकांचा शाळेत सक्रीयपणे सहभाग आणि भागीदारी असणे आवश्यक आहे.शाळा ही समाजाची लघु प्रतिमा आहे त्यामुळे जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य तथा केंद्रातील सर्व शिक्षक यांची शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सक्षमीकरण प्रशिक्षण दि 25 मार्च 2022 ला धानोरा येथे आयोजित करण्यात आले होते
शाळा व्यवस्थापन समिती यांचे अधिकार आणि कर्तव्य याबाबत विविध आंतरक्रिया आणि गटकार्य यांच्या मदतीने राजेंद्र खुडसंगे यांनी सादर करून सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांचे उद्बोधन करण्यात आले.
या प्रशिक्षणाला धानोरा शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष संजय कारवटकर, केंद्रप्रमुख चंद्रभान शेळके, सहायक केंद्रप्रमुख विजय दुर्गे ,रामजी महाजन व बाबाराव घोडे, संदिप शिरसागर,अशोक येणोरकर सर, धानोरा केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षण समिती सदस्य हे उपस्थित होते .