प्रशासक काळातील नविन देशी दारू चिल्लर विक्री दुकानाला दिलेली एन.ओ.सी. चा फेरविचार करणे बाबत शिवसेनेकडून निवेदन

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

नगरपंचायत राळेगाव कडून प्रशासक काळात तत्कालीन मुख्याधिकारी श्री अरुण मोकळ यांनी दिलेली नवीन देशी दारू चिल्लर विक्री दुकानासाठी ची ना हरकत प्रमाणपत्र वर सभागृहात चर्चा घडवून एन ओ सी चा हे विचार करण्याची मागणी चे निवेदन शिवसेनेकडून नगराध्यक्षांना देण्यात आले याप्रसंगी शिवसेना कार्यकर्ते शंकर गायधने इम्रान हैदर पठाण पार्वताबाई मुखरे योगेश म लोंढे महादेवराव मुखरे दीपक येवले सुनील शिरसागर मंगेश शिरसागर राजू किनेकर इत्यादी उपस्थित होते नगरपंचायत राळेगाव कडून दिनांक२९-०३-२०१७ ला राळेगाव नगर पंचायत हद्दीत नवीन देशी दारू दुकानांना ना हरकत प्रमाणपत्र परवानगी देण्यात येऊ नये असा ठराव पारित करण्यात आला होता या ठरावाचे सूचक माजी नगरसेविका सौ छाया पिंपरे तर अनुमोदन शिवसेना माजी नगरसेविका मीना शंकर गायधने यांचे होते प्रशासक काळात तत्कालीन मुख्याधिकारी श्री अरुण देवचंद मोकळ यांनी आपल्या सेवेच्या अंतिम दिनी सौ उषा राजू शेट्टी राहणार नवी मुंबई ठाणे यांना व्यवसायासंबंधी पत्रात कोणताही उल्लेख नसताना प्रभाग क्रमांक सहा मध्ये नवीन देशी दारूचे चिल्लर विक्री दुकानासाठी अर्थ पूर्णपणे दिनांक ९-९-२०२१ ला ना हरकत प्रमाणपत्र दिले या प्रकाराबाबत विद्यमान शिवसेना नगरसेविका सिमरन इम्रान पठाण यांनी सर्व कागदपत्राच्या पुराव्यानिशी हा विषय सर्वसाधारण सभेत घेण्यास नगराध्यक्षांना पत्राद्वारे विनंती केली परंतु ज्येष्ठ सदस्यांनी विषयाला बगल देत दिनांक ७-६-२०२२ च्या सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेच्या विषय क्रमांक 9 वर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पत्रावर चर्चा करणे हा विषय ठेवण्यात आला तत्कालीन मुख्याधिकारी अरुण देवचंद मोकळ यांच्याकडून प्रशासक काळात अर्थपूर्ण दिल्या गेलेली नवीन देशी दारूचे चिल्लर विक्री दुकानासाठी एनओसी व नगरपंचायत मध्ये राळेगाव नगर पंचायत हद्दीत नवीन देशी दारू चिल्लर विक्री ची दुकानांना ना हरकत परवानगी देण्यात येऊ नये असा ठराव यावर सर्वसाधारण सभेत चर्चा होणे अपेक्षित आहे राळेगाव शहरात वाढणाऱ्या देशी दारू चिल्लर विक्री दुकानामुळे परिसरात भविष्यात अनेक गरीब कुटुंबांची राखरांगोळी होण्याचा धोका आहे तरी सर्व नगरसेवक बंधू-भगिनींनी या नवीन देशी दारू च्या चिल्लर विक्री दुकानाच्या एन ओ सी वर फेरविचार करून प्रशासन काळात दिल्या गेलेल्या एन ओ सी चर्चा घडवून दोषी अधिकारी कर्मचाऱ्यावर कार्यवाही करावी अशा आशयाचे निवेदन नगराध्यक्षांना शिवसेनेकडून देण्यात आले.