
वरोरा तालुक्यातील बोडखा मोकाशी ते कोसरसार,वाळू माफिया मुळे रस्त्याची पूर्ण दुर्दशा झाली.
या परिससरात कोणताही रेतीचा घाट लिलाव नसून शासनाचा महसूल बुडवत आहे.
वर्धा जिल्हातील डोंगरगाव नदी मधली रेतीची तस्कर करून रस्त्यावर लोडेड ट्रॅक्टर चालवणे त्यामुळे बोडखा गावातील सामान्य जनता त्रस्त आहे तसेच रस्त्याच्या दुर्दशा झाल्यामुळे अपघात ची शक्यता असल्याने जिवतीहानी होऊ शकते.
येणाऱ्या लोडेड गाड्या बोडखा रस्त्याने बंद व्हावे आणि अवैध रेती उत्खनन बंद व्हावे तसेच वाळू माफिया ची दादागिरी ची भाषा बंद व्हावी यासाठी युवासेना जिल्हा चिटणीस चंद्रपूर मनिषभाऊ जेठानी व शिवसेना सोशल मीडिया सेल तालुका प्रमुख वरोरा गणेश नामदेवराव चिडे यांनी वरोरा येथे तहसीलदार मॅडम वरोरा व उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांना निवेदन देण्यात आले.
