विद्युत वितरण कंपनीच्या अंतर्गत कलगी तुऱ्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास,ढाणकी गाववासी यांची समस्या

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

ढाणकी गाव नगरपंचायत दर्चाचे असून येथील बाजारपेठ सुधा मोठी आहे गेल्या १५ दिवसापासून पथदिवे बंद असल्या कारणाने नगरपंचायत व विद्युत वितरण कंपनीच्या अंतर्गत कलगी तुऱ्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मात्र याचा त्रास होत असताना दिसतो आहे तसेच गावातील मुख्यबाजारपेठीतील पथदिवे बाद असल्या कारणाने रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसलेले आहे असा वेळेस एखादी दुर्घटना सुधा होऊ शकते तसेच लुटमारी करणारी व चोरी करणारी टोळी आपला डाव कधी साधवेल सांगता येत नाही तरी पण संबंधित यंत्रणा पथदिवे चालू करून सर्वसामान्याचि अडचण सोडविण्यास असमर्थ असताना दिसत आहे तसेच यामुळे गावात जाणारा रस्ता मुख्य बाजारपेठ हनुमान मंदिर परिसर व गावातील अनेक वार्डात अंधाराचे साम्राज्य आहे त्यामुळे संध्याकाळी झाली म्हणजे लोकांना घराबाहेर निघण्याची भीती वाटते आहे नगरपंचायत दरवर्षी हजारो रुपये खर्च करत असताना गावात अंधार का असा प्रश्न पडतो आहे
तसेच गावातील अनेकरुग्ण असलेली वृद्ध मंडळी नियमित तपासणी साठी म्हणून नांदेड येथे जात असते व तालुक्याहून ढाणकी गावाला येण्यासाठी शेवटची एस टी रात्री ८ वाजता आहे याच गाडीमधून अनेक रुग्ण असलेली आणि इतर बाहेर गावी नोकरी निमित्य असलेला प्रवाशी वर्ग येत असतो पण गावात सर्वत्र अंधार असल्यामुळे त्यना घराची वाट शोधणे जिकीरीचे बनले आहे तसेच पावसाळ्याच्या दिवसात सापासारखे प्राणी व चावा घेणारे विषारी अनेक कीटक वावरत करत असतात आणि हे सरपटणारे प्राणी घरात घुसतात त्यामुळे प्राणहानी होण्याची शक्यता आहे दरम्यान नगरपंचायत व अंदाजे ३०हजार लोकसंखेचे गाव अंधारात असल्यामुळे संबंधित यंत्रणा हि कुंभकर्णी झोपेत आहे की काय अशी चर्चा दबक्या सुरात गावकरी करत आहे तसेच काही दिवसापूर्वी नगरपंचायत चि पोटनिवडणूक झाली त्यावेळेस आशस्वासनाचा महापूर देणारे नेते गावात फौज फाट्यासह ठाण मांडून बसले होते मग हे नेते व या भागाचे लोकप्रतिनिधी नेमके गेले कुठे अशी चर्चा गावकरी करीत असताना दिसत आहे.