
राळेगाव तालुका प्रतिनिधी:–रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील वडकी येथील मयूर कैलास केराम वय 18 वर्ष व बंटी जगदीश चांदेकर वय 20 वर्ष हे दोन युवक वडकी ते राळेगाव रोडवरील खडकी गावाजवळ आज शनिवार दि. ४ डिसेंबर २०२१ चे पहाटे ६ वाजता चे दरम्यान रोडवर मार्निग वॉक करून व्यायाम करीत असता अज्ञात भरधाव वेगात आलेल्या ट्रक ने दोघांनाही रोडवरच पहाटे चिरडले व ट्रक पळून गेल्याची रोडवर हृदयद्रावक घटना घडली.
प्राप्त माहिती नुसार वडकी येथील हे युवक पहाटे मार्निंग वॉकसाठी वडकी येथुन खडकी पर्यंत जात होते. आज ४ डिसेंबर रोजी मयूर केराम व बंटी चांदेकर हे दोन्ही युवक मार्निंग वॉक करीत खडकी गावाजवळ येऊन रोडवर दोघे जण व्यायाम करीत होते तर यावेळी अज्ञात ट्रकने भरधाव वेगात निष्काळजी पणे वाहन चालवत येऊन रोडवर व्यायाम करीत असलेल्या मयूर केराम व बंटी चांदेकर यांच्या अंगावरुन ट्रक नेऊन पळून गेला. यामध्ये मयूर केराम याचे मुंडके व अर्धे शरीर धडावेगळे
झाले तर दुसरा युवक बंटी चांदेकर गंभीर जखमी असून त्याला वडणेर येथे हलविण्यात आले असून त्यांचेवर उपचार करीत असताना त्याला डॉक्टरनी मृत घोषित केले सदर घटनेची माहिती वडकी पोलिसांना मिळताच ठाणेदार विनायक जाधव,psi मंगेश भोंगाडे, पोलीस कर्मचारी रमेश मेश्राम,किरण दासरवार,विलास जाधव,विक्की धावर्तीवर,यांनी
घटना स्थळावर लगेच धाव घेतली व मृतदेह पुढील उपचारास रुग्णालयात पाठविण्यात आले असून,पळून गेलेल्या वाहनाचा पोलीस शोध घेत आहेत. दोन्ही युवक अविवाहित असुन यामुळे केराम व चांदेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
