
वाशिम – पेरणीच्या हंगामामध्ये जिल्हयातील शेतकर्यांना कृषी सेवा केंद्रांकडून अनियमित खतपुरवठा व दामदुप्पट दराने विक्रीबाबत दिलेल्या निवेदनावर कृषी कार्यालयाने कोणतीच कार्यवाही न केल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवार, १७ जुन रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डफडे वाजवून ठिय्या आंदोलन पुकारण्यात आले आहे. यासोबत पक्षाच्या वतीने अधिकार्यांना शेणखताची बॅग भेट देण्यात येणार आहे. यासंदर्भात मनसे जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात १६ जून रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, जिल्हयामधील खत विक्रेत्यांकडे सद्यस्थितीत प्राप्तसाठा, विक्री झालेला साठा व शिल्लक असलेला साठा व या खताचे विक्री दर हे दर्शविणारे फलक ठळक अक्षरात माहिती लिहून खत विक्री स्थळाचे प्रथमदर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. याच फलकावर तुटवड्याची माहिती असणे देखील आवश्यक आहे. जेणेकरुन कास्तकारांना आवश्यक माहिती सुलभतेने उपलब्ध होवू शकेल. बाजारांमध्ये काही विशिष्ट प्रकारचे खताचा तांत्रिक तुटवडा निर्माण करुनही खते चढ्या दराने, दामपटीने विक्री होत असल्याची चर्चा आहे. तसेच बोगस खते विक्रीकरीता वातावरण निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात कृषि विभागाचे तपासणी अधिकारी, विस्तार अधिकारी (कृषि) यांचेकरवी जिल्हयातील, स्थानिक वाशिम शहरातील खतपुरवठा दुकानदारांची तपासणी करण्यात यावी. संबंधितांना आवश्यक सुचना निर्गमित व्हाव्यात व शेतकर्यांची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी २ जून रोजी पक्षाच्या वतीने दिलेल्या निवेदनाव्दारे करण्यात आली होती. मात्र निवेदनावर कृषी विभागाने कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करुन अधिकार्यांना शेणखताची बॅग भेट देणार असल्याचे नमूद केले आहे. तरी या आंदोलनात मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्यासह मनसे जिल्हा उपाध्यक्ष संतोष इंगोले, तालुकाध्यक्ष मोहन कोल्हे, उपाध्यक्ष विठ्ठल राठोड, किशोर गजरे, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष रघुनाथ खुपसे, वाशीम शहराध्यक्ष कृष्णा इंगळे, उपाध्यक्ष गणेश इंगोले, प्रतिक कांबळे, सचिव प्रकाश कवडे, महिला सेना जिल्हाध्यक्ष सीता धंदरे, उपाध्यक्ष रंजना राठोड, सचिव स्मिता जोशी, शहर उपाध्यक्ष सौ. वंदना अक्कर, मालेगाव शहराध्यक्ष बेबी कोरडे, तालुका उपाध्यक्ष वनिता पांडे, प्रमिला इंगळे, अर्चना इंगळे, प्रमिला थोरात, जिल्हा उपाध्यक्ष केशव गरकळ, संतोष इंगोले, जिल्हा सचिव सतिश कडवे, रिसोड तालुकाध्यक्ष दिपक वाघ, शहराध्यक्ष संजय येवले, उपाध्यक्ष संतोष पौळ, रवि सुरुशे, लक्ष्मण वानखेडे, सचिव धनिराम बाजड, उपाध्यक्ष अमोल तुरेराव, मालेगाव तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी, शहराध्यक्ष विक्की वर्मा, उपाध्यक्ष गजानन कुटे, उपाध्यक्ष विनोद वानखेडे, सचिव रितेश राठोड, मुंगळा सर्कल अध्यक्ष सुनिल शेंडगे, डोंगरकीन्ही सर्कल अध्यक्ष आकाश कुटे, उपाध्यक्ष आतिष डहाळे, उपाध्यक्ष आकाश राठोड, सचिव गोविंद अहिर, वाशिम तालुकाध्यक्ष मोहन कोल्हे, शहराध्यक्ष कृष्णा इंगळे, उपाध्यक्ष विठ्ठल राठोड, उद्धव ढेकळे, किशोर गजरे, शहर उपाध्यक्ष प्रतिक कांबळे, गणेश इंगोले, सचिव प्रकाश कवडे, उपाध्यक्ष जीवन वानखेडे, वाहतुक सेना चिटणीस विनोद सावके, शंकर घोडे, शहराध्यक्ष विजय जाधव, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष दिनेश गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष मनोज राऊत, तालुकाध्यक्ष रघुनाथ खुपसे, वैभव वानखेडे, कुशांत धोटे यांनी केले आहे.
