जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे यांची सोलर चरखा उद्योगाची पाहणी.

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

माननीय जिल्हाधिकारी साहेब श्री अमोल येडगे यांनी दिनांक १५ जुनला सावंगी पेरका ता. राळेगाव येथे ” कापूस ते कापड ” या प्रकल्पाअंतर्गत पहिला टप्पा सोलर सोलर चरखा द्वारे धागा निर्मिती या सौ. जया मधुकर कमराम यांचेकडे सुरू असलेल्या उद्योगाला सदिच्छा भेट दिली व सदर उद्योगातील अडी अडचणी जाणून घेतल्या तसेच अधिकाधिक लोकांना प्रोत्साहित करणे , क्लस्टर उभारण्याविषयीचे प्रयत्न करणे ईत्यादी मुद्यावर कार्य करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी साहेबांनी दिले. या उद्योगाला सक्षम करण्यासाठी सहकार्य करण्याच्या सुचना कर्मचारी मंडळींना दिल्या.
तसेच धागा उत्पादनानंतरचा दुसरा टप्पा हा ‘ कापड निर्मिती चा राहील व त्याचे प्रशिक्षणाकरीता इच्छुक व्यक्तींचे नाव नोंदणी सुरू झालेली आहे , ही माहिती जिल्हाधिकारी साहेबांना प्रकाश झलके यांनी दिली आणि कापड विक्रीसाठी विषेश मदत करावी ही विनंती करण्यात आली .
गेल्या सहा महिन्यांपासून सावंगी व आटमुर्डी ता.राळेगाव येथील १० व्यक्तींनी स्वतःच्या गुंतवणुकीतून हा चरखा उद्योग सुरू केला, या मधे गजाननराव सुरकर , सौ. जया मधुकर कमराम , सौ. सुनीता विजय कोवे , राजेंद्र ओंकार , आकाश लोखंडे , रमेशराव पाटील , सतीश पाटील , किशोर भोयर , महेश पाटील व प्रकाश झलके ही मंडळी आहेत . यांचेकडे स्वतःच्या घरीच धागा उत्पादन सुरू झालेय .
या भेटी मध्ये जिल्हाधिकारी साहेबांसोबत एस.डि.ओ. श्री शैलेश काळे , तहसीलदार डॉ. रविंद्र कानडजे , बि.डि.ओ.साहेब , क्रुषी अधिकारी साहेब , श्री रुपेश हिरुळकर प्रकल्प अधिकारी MCED., इत्यादी अधिकारी हजर होते .