
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
आज इथे तर उद्या तिथे, तर काही ठीकाणी पावसाचा पत्ता च नसल्याने बळीराजा चिंताग्रस्त होत आहे.
राळेगांव तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला च काही शेतकरी बांधवांनी धूळपेरणी केली आहे.पण हवा तसा पाऊस पडत नाही. राळेगांव शहरात चार ते पाच वेळा चांगल्या पावसाने हजेरी लावली पण दोन तीन किलोमीटर अंतरावर काहीच पाऊस नाही असा प्रकार सुरु आहे. तालुक्याच्या काही ठीकाणी धुवांधार पाऊस पडला नाल्यांना पूर देखील आला आहे हे विशेष. आजही तालुक्यात काही ठीकाणी शेतात ओल कायम असून,तर कोठे कोठे पेरलेल्या बियाण्यांना चांगल्या पावसाची प्रतिक्षा आहे. ऊन पावसाचा खेळ सुरु असल्याने पंचड उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. बदलत्या वातावरणामुळे आरोग्य विषयक तक्रारी वाढत आहे. या मान्सून चं वैशिष्ट्य म्हणजे वीजेचा कडकडाट मोठ्या प्रमाणावर वाढला असून वीज पडल्याने मृत्यू देखील झाले आहेत तर वादळी वाऱ्या मुळे आठमूर्डी व पळसकुंड परिसरात घरा सह इतर मालमत्तेचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. आज पर्यंत राळेगांव तालुक्यात चौपन्न मी.मी.पावसाची नोंद झालीआहे.
मागील वर्षी रोहिणी व मृग नक्षत्रात पिकांसाठी योग्य प्रमाणात पाऊस पडल्याने पेरण्या साधल्या होत्या.
पण त्या नंतर मोठया प्रमाणावर अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. यावेळी मात्र पाऊस सर्व ठीकाणी पडत नसल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त होत आहे.
