
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
जि. प.उ. प्रा. म.शाळा वनोजा, केन्द्र धानोरा ता राळेगाव येथील शिक्षिका सविता उईके यांना अग्निपंख शैक्षणिक समूह द्वारे आयोजित ‘राज्यस्तरिय नवोपक्रमशील शिक्षक गुणगौरव सोहळा 2021-2022’ श्रीराम टॉकीज मंगल कार्यालय उमरखेड जि. यवतमाळ. दि 5 जून 2022 ला आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य पुरस्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष जगविख्यात रसायनशास्त्रज्ञ डॉ. ए. ए. नातू याच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी राज्यविज्ञान मंडळाचे संचालक डॉ. रविंद्र रमतकर, अधिव्याख्याता नितीन भालचक्र, शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी, गशिअ वसंत महाले, गशिअ पाडुरंग खांडरे , सेवानिवृत्त मु. अ. नामदेव गोपेवाड यांच्या आकर्षक उपस्थितीत शिक्षक गुणगौरव सोहळा संपन्न झाला.
सन्मानित शिक्षिका सविता उईके यांनी ‘शाळा बंद पण शिक्षण सुरू’ या उपक्रमाअंतर्गत झुम अॅप व व्हाट्स अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सुरु ठेवले तसेच विविध प्रयत्न करून ऑफलाईन शिक्षण सातत्याने सुरू ठेवले, सध्या त्या इंग्रजी पायाभूत प्रश्नावर आधारित विविध टॉपिकवर (उदा. About my teechar about my School, About babies इत्यादी) 30 गुणाची गुगल फॉर्म द्वारे इंग्रजी ऑनलाईन टेस्ट तयार करत आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून विद्यार्थी हिताचे असल्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांकडून खूप प्रतिसाद मिळत आहे. याआधी त्यांना दोनवेळा जिल्हा पुरस्काराने सन्मानित केले. राज्यस्तरिय अग्निपंख शैक्षणिक समूहाचे समन्वयक गजानन गोपेवाड सरांच्या अथक परिश्रमाने व उत्कृष्ट नियोजनाने राज्यातील
51 शिक्षक – शिक्षिका व ५ बालशास्त्रज्ञ यांना या नयनरम्य भव्यदिव्य राज्यपुरस्कार सोहळ्याचे एक साक्षीदार बनविले.
या सत्काराचे श्रेय आदरणिय डायट प्राचार्य यवतमाळ, जिल्हा व तालुक्याचे आदरणिय सर्व अधिकारी व BRC इंग्रजी विभाग प्रमुख, केन्द्रप्रमुख व मुख्याध्यापक व शाळेतील सर्व शिक्षक यांना देते.
