अवैध रेतीची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त,वडकी पोलिसांची कारवाई

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

        

वडकी पोलिसांनी आज दि 4 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास अवैध रेती वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरला ताब्यात घेतले असून जवळपास साडे नऊ लाखांच्या मुद्देमालासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.हि कारवाई वडकी पोलिसांनी आज ४ डिसेंबर रोजी शनिवारी पहाटेच्या दरम्यान केली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एम.एच.३२ ए.एच.५२३० या क्रमांकाचे ट्रॅक्टर व नंबर नसलेली ट्राॅली लगतच्या हिंगणघाट तालुक्यातील धोच्ची या घाटातून अवैध वाळूची वाहतूक करीत असताना वडकी येथील राळेगाव पाॅईंट जवळ वडकी पोलिसांनी ताब्यात घेतली.तर दुसऱ्या कारवाईत मुदापुर नाल्यांची वाळू उपसा करून नंबर नसलेल्या एका निळ्या रंगाच्या ट्रॅक्टर व ट्राॅलीमधून चहांद गावात अवैध वाहतूक करीत असताना परसोडा गावाजवळ वडकी पोलिसांनी पहाटेच्या गस्त दरम्यान पकडला.या प्रकरणी वाहन चालक गणेश पांडुरंग ढेकणे वय (२२) रा.धोच्ची ता.हिंगणघाट व क्रिष्णा नानाजी पाल.(३०) रा.वाटोडा ता.राळेगांव यांचे सह ट्रॅक्टर मालक राजेंद्र महादेव नरुले (३८) रा धोच्ची ता.हिंगणघाट जिल्हा वर्धा व प्रशांत मारोतराव कुबडे (३०) रा.चहांद यांच्या विरोधात कलम ३७९,३४ भा.द.वी.सह कलम ४८ जमिन महसूल कायदा सह कलम १३०(१)(३) १७७ मो.वा.का.अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून जवळपास ९ लाखांच्या दोन्ही वाहनांसह ९ हजार रुपये किंमतीची दोन ब्रास वाळू वडकी पोलिसांनी जप्त केली आहे.ही कारवाई वडकीचे ठाणेदार विनायक जाधव सह पीएस आय मंगेश भोंगाडे,विलास जाधव,रमेश मेश्राम,किरण दासरवार,विक्की धावर्तीवर,यांनी पार पाडली.