
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
कृषी दूतांची जिल्हा मध्यवर्ती बँक यवतमाळ येथे भेट
ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम 2022 अंतर्गत मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय यवतमाळ येथील विद्यार्थी सुमेध सुरेश भोयर, प्रणय साहेबराव मून, चैतन्य नरसिंग राठोड, वैभव रवींद्र गावंडे यांनी यवतमाळ, जि. मध्यवर्ती बँकेला नुकतीच भेट दिली. या भेटीदरम्यान श्री आर. आर. सिद्दीकी (उपसरव्यवस्थापक शेती विभाग) यांनी पीक कर्ज व पिक विमा याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच हा उपक्रम घेताना (प्राचार्य) डॉ. आर. ए. ठाकरे ,(उपप्राचार्य) पी. व्हि. कडू, कार्यक्रम अधिकारी प्रा. सौरभ महानुर व विषय शिक्षक प्रा. चेतन ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडला.
