कृषि संजिवनी सप्ताह अंतर्गत कृषी महाविद्यालय मुल (सोमनाथ) विद्यार्थ्यांचा आभिनव उपक्रम


( वरोरा) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत दि. २५ जून २०२२ ते ०१ जुलै २०२२ या कालावधीत कृषि संजिवनी मोहिम आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. कृषी महाविद्यालय मुल (सोमनाथ) चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विष्णुकांत टेकाडे ,कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. श्रीकांत अमरशेटटीवार, कार्यक्रमाधिकारी डॉ. नवलकर सर याच्या मार्गदर्शनाखाली. याच मोहिमेअंतर्गत दिनांक 28 जून 2022 रोजी तुळणा ग्रामपंचायत समोर श्री .एच डी कोसरकर सर (कृषी पर्यवेक्षक वरोरा ),कु. केतकी भजभुजे( प्रक्षेत्र अधिकारी वरोरा),श्री .एस पी असतकर (कृषी सहाय्यक वरोरा) , कु.जयमाला ताणले (कृषी मित्र तुलाना), श्री. बंडोजी डेंगळे (पोलीस पाटील तुलाना), सौ. ताराबाई देहरकर(अगंनवाडी सेविका), श्री. विजय ठेंगणे (प्रगतीशील शेतकरी वरोरा तुलाना),श्री. बाळाभाऊ बोडाले (प्रगतीशील शेतकरी तुलाना) आणि गावातील शेतकऱ्यांच्या उपस्थित , विविध पिकांचे तंत्रज्ञान प्रसार, मुल्यसाखळी बळकटीकरण ,पौष्टिक तृणधान्य ,महिला कृषि तंत्रज्ञान सक्षमीकरण ,खतांचा संतुलित वापर अशा विविध मुद्द्यांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन रावे विद्यार्थी ग्रुप तुलाना यांनी केले.तसेच शेतकऱ्यांचे त्याबद्दल असलेल्या प्रश्नांचे समाधान रावे विद्यार्थ्याकडून करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध कार्यक्रमांचा हा थोडक्यात आढावा-
1)सदर कार्यक्रम आयोजन हे कृषी महाविद्यालय मुल मरोडा रावे विद्यार्थी ,कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि अंबुजा सिमेंट फाउंडेशन यांनी केले. सदर कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन रावे विद्यार्थी ग्रुप तुलाना यांनी केले.
2).कार्यक्रमात शेतकऱ्यांनी कीटकनाशक फवारताना कोणती काळजी घ्यायची याबद्दल श्री. एच डी कोसरकर सर आणि कुमार रवींद्र घोगरे यांनी मार्गदर्शन केले.तसेच त्यासंबंधित असलेली किट कु, कौतुक वैद्य याने परिधान करून प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना करून दाखवले. अंबुजा फाउंडेशन कडून या प्रात्यक्षिकासाठी माहिती पत्र तयार करण्यात आले होते .त्याचे वाटप शेतकऱ्यांमध्ये करण्यात आले तसेच जे शेतकरी कार्यक्रमाला उपस्थित नव्हते त्यांच्या घरी जाऊन विद्यार्थ्यांनी हे माहितीपत्र दिले.
3)कार्यक्रमात योग्य प्रकारे खत कसे वापरायचे खत वापरताना त्याचे मोजमाप कसे करायचे व संतुलित खताचा उपयोग याबद्दल कु. वैभव पावडे आणि कु. रवींद्र घोगरे यांनी मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले.
4)कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सॉफ्ट वुड ग्राफ्टिंग वर या विषयावर कु. रोहन गोखरे आणि कु.किरण बुधवत यांनी शेतकऱ्यांसमोर प्रात्यक्षिक केले. सदर प्रात्यक्षिकाला कु.रवींद्र घोगरे ,कु. वैभव पावडे ,कु. कौतुक वैद्य यांचे साह्य लाभले.
5) कापसावरील मित्र कीटक आणि शत्रू कीटक त्यांचे तोटे व उपयोग व फायदे यावर सविस्तर माहिती रावे विद्यार्थी आणि कुमारी केतकी भजभूजे यांनी दिली तसेच यासंबंधीतील माहिती पत्र शेतकऱ्यांना पुरवण्यात आले
6)कार्यक्रमाच्या शेवटी शेतकऱ्यांसाठी अंबुजा सिमेंट फाउंडेशन तर्फे प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत सर्वात जास्त विजय ठेंगणे आणि सौ. ताराबाई देहरकर यांनी उत्तरे दिली व ते विजेते ठरले. विजेता शेतकऱ्याला श्री .एच डी कोसरकर सर ,कु. केतकी भजभुजे ,श्री .एस पी असतकर यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले .