खांबाडा परिसरात कपाशी व सोयाबीन पिकांचे नियोजनाबाबत शेतीशाळेचे आयोजन

प्रतिनिधी:जुबेर शेख,वरोरा


मौजा खांबाडा व वाठोडा येथे मंडळ कृषि अधिकारी टेमुर्डा ता. वरोरा यांचे सहकार्याने क्षेत्रीय एकीकृत नाशिजीव प्रबंधन केंद्र नागपूर द्वारे कपाशी व सोयाबिन पिकांचे शेतीशाळेचे नियोजन करण्यात आले आहे. या शेतीशाळेत कापूस व सोयाबिन पिकासाठी 14 आठवडे एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन तसेच मूल्यर्धन व निर्यात बाबत मार्गदर्शन होणार आहे. या नियोजित कार्यक्रमाचे दि 4 जुलै ला औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रस्ताविक भाषणात डॉ. मनीष मोंढे, सहायक निदेशक, क्षे.ए.ना. प्र.के. नागपुर यांनी शेती शाळेची रूपरेषा शेतकऱ्यांना संक्षिप्तपणे दिली. तसेच कपाशीमध्ये एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापनाचे महत्त्व समजावून सांगितले . शेती शाळा ही 14 आठवडे चालू राहणार असून त्यामध्ये एकात्मिक व्यवस्थापना च्या विविध प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात येईल. सोबतच शेतकऱ्यांमध्ये निर्यातक्षम शेतमाल तयार करून निर्यात बाबत सविस्तर माहिती देण्यात येईल.
कु चव्हाण मॅडम मंडळ कृषि अधिकारी यानी भारत सरकार चा अभिनव उपक्रमा चा शेतकर्यानी जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रम प्रसंगी श्री श्याम सुंदर टाक सहा. वनस्पति संरक्षण अधिकारी, श्री प्रल्हाद कोल्हे, तांत्रिक अधिकारी आणि श्री डोंगरकार कृषी पर्यवेक्षक तसेच श्री चौरे कृषि सहायक उपस्थित होते.