

प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा
रत्नमाला चौक येथून वरोरा शहराकडे जाणाऱ्या MH34 AA 7743 या क्रमांकाचे चाकी वाहन उड्डानपुलावरून जात असताना अचानक टायर फुटल्याने गाडीवरचा ताबा सुटून पलटी झाली.घटना घडली तेव्हा गाडी मध्ये चालक व सहकारी उपस्थित होते.उपस्थितांपैकी कोणालाही दुखापत झालेली नाही ही बाब विशेष. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी पलटी झालेल्या गाडी ला सरळ केले, चालक व सहकाऱ्यांना बाहेर काढले.
