शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

वरोरा तालुक्यातील आमडी येथील रहिवासी शरद पुंजाराम चौधरी वय 45 वर्ष याने 23 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास विष प्राशन करून आत्महत्या केली.शरद चौधरी यांच्याकडे 3 एकर शेती होती.या शेतीत आपला संसाराचा गाढा चालणार नाही म्हणून या ऐंशी हजार रुपये कर्ज काढून 18 एकर जमीन ठेक्याने केली होती. दुबार पेरणी ,संततधार पाऊस यामुळे शेतातील पीक पूर्णपणे नष्ट झाले.घेतलेले कर्ज कसे फेडणार या विवंचनेत शरद मागील काही दिवसापासून होता.त्यामुळे त्याने विष प्राशन करून आत्महत्या केली.शरद यास पत्नी ,2 मुली ,आई ,वडील असा परिवार आहे.शरद ने विष प्राशन केल्याचे कळताच उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे दाखल करण्यात आले.परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने चंद्रपूर ला रेफर करण्यात आले .दरम्यान त्याचा मृत्यू झाला.