
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पहावी व मोठे पद गाठावे सोबतच वैज्ञानिक दृष्टीकोन कायम बाळगावा शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श कायम समोर ठेवावा त्यांनी ज्या परिस्थितीत यश संपादन केले त्यातून विध्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणा मिळेल सोबतच विद्यार्थ्यांनी गुण आणि गुणवत्ता याचा समन्वय ठेऊन शिक्षण घेतल्यास यश नक्की मिळेल असे प्रतिपादन राज्याचे माजी शिक्षण मंत्री प्रा वसंत पुरके यांनी केले नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण विभाग तसेच शिक्षण व आरोग्य विभागातर्फे विध्याथी गुणगौरव सोहळा संतकृपा मंगल कार्यालयात संपन्न झाला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पुरके सर बोलत होते कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष रविंद्र शेराम तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याधिकारी माधुरी मडावी, उपाध्यक्ष जानराव गिरी,वसंत जिनिंगचे सभापतो नंदकुमार गांधी,ग्राविकाचे अध्यक्ष सचिन हुरकुंडे, बांधकाम सभापती संतोष कोकुलवार, शिक्षण व आरोग्य सभापती कुंदन कांबळे,महिला व बालकल्याण सभापती मोहिनी बोबडे आदी उपस्थित होते यावेळी शहरातील प्रत्येक शाळेतील दहावी व बारावीच्या परीक्षेत गुणानुक्रमे प्रथम व द्वितीय आलेल्या विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह व स्कुलबॅग देऊन विध्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले शहरातील23विध्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला सोबतच कोरोनाकाळात जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या 18 आशासेविका,आरोग्यसेविका व गटप्रवर्तक यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला सोबतच महाराष्ट्र आयडॉल पुरस्काराने सन्मानित डॉ शीतल संतोष कोकुलवार यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला तसेच ग्रामपंचायतिचे सेवानिवृत्त कर्मचारी यांना यावेळी लाभांश वाटपाचे धनादेश देण्यात आले तसेच त्यांचाही शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला व बालकल्याण सभापती मोहिनी बोबडे यांनी सूत्रसंचालन तबससुम शेख ,प्रतीक्षा नहाते यांनी तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष जानराव गिरी यांनी केले कार्यक्रमाला नगरसेवक नलु शिवणकर, कमलेश गहलोत,बाळू धुमाळ , दिलीप दुधगिकर ,मंगेश राऊत,सिमरन पठाण,ज्योत्स्ना राऊत,कविता कुडमेथे, अस्विनी लोहकरे,कमरूनिसा पठाण,पुष्पा किनाके, ज्योत्स्ना डंभारे ,मधूकर राजूरकर आदी उपस्थित होते.
