
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
वाऱ्हा येथे गुरुपौर्णिमा निमित्ताने गोंडवाना गणतंत्र पार्टी च्या वतीने गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला उपस्थित मा.बळवंतराव मडावी राज्य कार्याध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी मा.मधुसुदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच मा.विजयाताई रोहणकर जिल्हा अध्यक्ष ( महिला ) गोंडवाना गणतंत्र पार्टी यवतमाळ मा.विठ्ठलभाऊ धुर्वे तालुका अध्यक्ष राळेगाव मा.विनोदभाऊ पराते कोपरी हे उपस्थित होते
भारतीय संस्कृतीत गोंडवाना गणतंत्र समाज व्यवस्था ही अनादी काळापासून आपली संस्कृती आणि परंपरा जोपासत आहेत आपण सर्व मानव निर्मित समाज निसर्ग पुजक आणि प्रकृती पुजक आहोत हिचं परंपरा गोंडवाना गणतंत्र समाज व्यवस्था मध्ये जपली आहे आणि आपल्या गुरुस्थानी असलेल्या गुरुवर्याला आपण स्मरण केले पाहिजे म्हणजे आपली संस्कृती टिकून राहिलं असे मतं मधुसूदन कोवे गुरुजी यांनी कार्यक्रमात व्यक्त केले आहे
“‘ गुरुनी दिला ज्ञान रुपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा “‘ गुरुपौर्णिमा निमित्ताने धर्म गुरु पहांदी पारी कोपार लिंगो यांच्या आठवणींना स्मरण करून गुरुपौर्णिमा साजरी केली पाहिजे गोंडवाना गणतंत्र समाज व्यवस्था मध्ये गोंडी धर्म गुरु पहांदी पारी कोपार लिंगो ना अनादी काळापासून गुरु स्थानी ठेवून मुठवा लिंगो गुरु पौर्णिमा पुजन एकोप्याने साजरे करताना दिसून येत आहे
या गुरु पौर्णिमा निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन सौ.अंजनाबाई आत्राम शाखा अध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी वाऱ्हा श्रीकृष्ण ऊईके, कवडुजी तुमराम ( कोपरी ) गजानन घोडाम, राहुल वाढवे, रमेश आतराम, शंकर सोयाम, गुंपा बाई सोयाम, तारा बाई कोकांडे, वैशाली मरापे, सिताबाई धुर्वे, शांताबाई वाढवे, सुरज पुरके, राजु वाढवे सर्व समाज बांधव उपस्थित होते.
