अंगणवाडी पोषण आहारात मोठा घोटाळा
युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल सोनाळे यांची तक्रार

तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाच्या कळंब अंतर्गंत येणाऱ्या अंगणवाड्यामध्ये पोषण आहार वाटपमध्ये संबंधित अधिकारी व ठेकेदाराने संगनमत करून लाखों रूपयाचा घोटाळा केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाने चौकशी सुरू केली असून जिल्ह्यात अन्यत्रही त्याची व्याप्ती तर नाही ना? या दिशेनेही सध्या यंत्रणा चौकशी करीत आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पातंर्गंत गरोदर व स्तनदा माता, ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील सर्वसाधारण बालके, कुपोषित व तिव्र कुपोषित बालकांना अंगणवडीच्या माध्यमातून गहू, मुंगडाळ,साखर, चना, तिखट, हळद, मीठ असा पोषण आहार देण्यात येतो. यासाठी नियुक्त एजन्सीच्या ठेकेदाराकडून प्रत्येक महिन्यात पोषण आहार पुरविण्याची जबाबदारी असते. एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाच्या कळंब अतंर्गंत सदारण १२५ अंगणवाड्या आहेत. मात्र या अंगणवाड्यांना पोषण आहार हा कमी देण्यात येत आहे या मध्ये गरोदर महिलेला २००० ग्राम चना ऐवजी १२०० ग्राम चना मिळतो आणि लहान मुलांच्या चना पाकीट मध्ये १५०० ग्राम ऐवजी १००० ग्राम चना पाकीट मध्ये मिळतो यामध्ये ठेकेदार हा पाकीट च्या मध्यभागात चिरा पडून त्यामधील चना कडून सेलोटेप ने चिकटून लाभार्थ्यांना तो आहार देण्यात येतो हा प्रकार मागील ४ ते ५ वर्षा पासून संबंधित अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने चालू आहे . याबाबत युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राहुल सोनाळे यांनी चौकशी केली असताना कळंब तालुक्यातील परसोडी बु, सावरगाव, चिंचोली, माटेगाव, टालेगाव, पिंपळगाव रु व अन्य गावातील अंगणवाड्यामध्ये वरील प्रकार लक्षात आला असता यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ साहेब यांना कळविले.
अशा प्रकारे पोषण आहार वाटपमध्ये घोळ करताना संबंधित अधिकारी व वाहतूक ठेकेदार यांनी लाखों रूपयांचा घोटाळा केल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी राहुल सोनाळे यांनी केलेल्या तक्रारीवरून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशान्वये जिल्हा एकात्मिक बाल विकास सेवा अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी थोरात यांच्या मार्फत संबंधितांची चौकशी करण्यात येणार आहे.