शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शेख फयाज यांची निवड

                 

ढाणकी प्रतिनिधी :प्रवीण जोशी


जिल्हा परिषद उच्च माध्यमिक उर्दू शाळा ढाणकी येथील शाळा व्यवस्थापन समितीची कार्यकारणी नुकतीच गठीत करण्यात आली असून शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शेख फयाज शेख रहेमत यांची बहुमताने निवड करण्यात आली.
सय्यद जावेद सय्यद पाशा यांची उपाध्यक्ष म्हणून तर सदस्य म्हणून शेख अन्सार, शेख फिरोज, शेख कलीम, सय्यद अतीक, सय्यद हुसेन, इरफाना बी, रेशमा अन्वर पटेल, सलमाबानो, मुमताज बी, फरजाना बी इत्यादी सदस्य उपस्थित होते.