
दिनांक 25 जुलै रोजी बिरसा क्रांती दल जिल्हा शाखा यवतमाळ अध्यक्ष श्री. रमेश भाऊ भिसनकर यांनी 18/07/2022 च्या मेजर जीवन कोवे ( माजी सैनिक) यांच्या तक्रारीवर आज रोजी पर्यंत कसल्याही प्रकारची चौकशी न झाल्यामुळे सदर तक्रारीवर त्वरित चौकशी करून दोषीना अटक करावे. अन्यथा बिरसा क्रांती दल हे संघटन आदिवासींच्या हक्क अधिकार व न्यायासाठी प्रशासना विरूद्ध रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रमेश भाऊ भिसनकर यांनी दिला त्यावेळी शरद चांदेकर अजाबराव मारेकर जगत सिंह चव्हाण, अनील चांदेकर सचिन कदम मेजर जीवन कोवे , पीयूष सलाम सर्व पदाधिकारी उपस्थित होते सदर निवेदन अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री धरणे साहेब यांना दिले.
