नुकसानचे पंचनामे करण्यास महसूल विभागाला मुहूर्त सापडेना ?


ढाणकी – प्रति (प्रवीण जोशी)


गेल्या दोन आठवडयात झालेल्या सलग पावसामुळे ढाणकी परिसरात पिकांचे मोठया प्रमाणात आतोनात नुकसान झाले असून अनेक भागात नदी नाल्यांच्या पुरांचे पाणी शेतशिवारात व घरात घुसल्याने जमीनीसह पिके खरडून गेली तर अतिवृश्टीच्या पावसात अनेकांच्या घराची पडझड झाली आणी अनेक कुटूंबे उघडयावर आली.
अतिवृश्टीत झालेल्या पिकांची व घरांची महसूल विभागाकडून पंचनामे करून नूकसान ग्रस्थांना नुकसान भरपाई देवून शेतकऱ्यांना व नागरीकांना दिलासा देण्यासाठी जिल्हाधीाकरी अमोल येडगे यांनी 13 जुलै रोजी उमरखेड तालूक्यातील पुराने बाधीत झालेल्या भागाला भेटी देवून तेथील नागरीकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
पुराचे पाणी शेतकऱ्याच्या शेतात घुसल्याने पिकासह जमीनी खरडून गेलेल्या तर काही ठिकाणी शिल्लक राहिलेली पिकेही पावसाच्या पाण्याने सडून गेल्याचे निदर्षनास आल्याने शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पिक पाहणी करून नूकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार उमरखेड यांना दिले मात्र पंधरवाडा उलटून गेला तरीही महसूल विभागाचा पटवारी,मंडळाधिकारी,कृशी विभागाचा कृषी स हा य्य काना ग्रामपंचायतचा ग्रामसेवक या पैकी कोणत्याही अधिकाऱ्याची नूकसान ग्रस्त शेतकऱ्याच्या बांधाकडे पाऊल वळली नाहीत.
राजकीय पक्षाचे पुढारी ,सामाजीक संघटनेचे पदाधीाकरी,आणि जागृक शे त ऱ्या नी यांनी उमरखेड तहसील व उपविभागीय कार्यालात लेखी निवेदण देवून सुध्दा महसूल विभागाला अजुनही जाग आली नाही.नुकसान ग्रस्त शेतकऱ्याच्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी मुहूर्त तर शोधत नसतील ना ? अशी शंका शेतकऱ्यां चे मनात खद्खद्त आहे.
मंडळाधिकारी ,पटवारी,कृशी सहायक,ग्रामसेवक इ.अधिकारी कर्मचाऱ्या ना शेतकऱ्यांना भ्रम्हणध्वनी व्दारे संपर्क करून पंचनामे करण्या संदर्भात विचारपूस केलीच तर अजून प्रोग्राम ठरायचा आहे.असे उत्तर देवून अतिवृश्टीत बाधीत झालेल्या शेतकऱ्या ची बोळवण करतात.आर्थीक संकटात सापडलेल्या शेतकरी यांना सरकार मायबाप सानुग्राहय अनुदान देण्यास तयार आहेत.मात्र लाल फितीचा खोडा शेतकरी यांच्या नशिबी आहे.