
तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225)
दिग्रसच्या वैभवात एक भर घालणाऱ्या नाट्यगृहाच्या निर्मितीची मुहूर्तमेढ शनिवार, २५ डिसेंबरला रोहण्यात येणार असून यासाठी सिनेमा कलावंत दिग्रस नगरीत अवतरणार आहेत.
येथील जुने बसस्थानक स्थानांतरीत झाल्यानंतर येथे टाऊन हॉल बांधण्यात आले होते, अनेक सार्वजनिक कार्यक्रम, लग्न समारंभासाठी उपयुक्त टाऊन हॉल आता तोडण्यात आले आणि नव्याने येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नाट्यगृह व डाॅ.ए.पी.जी.अब्दुल कलाम व्यापारी संकुल उभारण्यात येणार असून या कामाचे भुमिपुजन शनिवार, २५ डिसेंबरला करण्यात येणार असून यासाठी महाराष्ट्राची ‘हास्य जत्रा’ फेम, सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी, हास्य कलावंत समिर चौघुले व अरुण कदम यांची उपस्थिती राहणार आहे.आमदार संजयभाऊ राठोड यांच्या संकल्पनेतून हे नाट्यगृहाचे काम होणार असून शहराच्या वैभवात एक आणखी एक भर असल्याचे बोलले जात आहे.
