अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे दुःख सभागृहात मांडू :अजितदादा पवार

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर


शेतकऱ्यांचे दुःख सभागृहात मांडू अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले ,राळेगाव तालुक्यातही अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले ,शेतकऱ्यांचे शेत खरडून गेले ,पिकाचेही नुकसान मोठे आहे ही परिस्थिती आपण सभागृहात मांडू असे आश्वासन विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी झाडगाव येथे दिले झाडगाव येथील नुकसान ग्रस्त शेतकरी अभिमान बोभाटे यांचे शेताची पाहणी करताना अजितदादा बोलत होते यावेळी माजीमंत्री प्रा वसंतराव पुरके,बाजारसमिती सभापती तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड प्रफुल्ल भाऊ मानकर,काँग्रेस ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष अरविंद राव वाढोनकर ,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष क्रांती कामारकर, जिल्हा बँकेचे संचालक वसंतराव घुईखेडकर,नगराध्यक्ष रवींद्र शेराम ,उपनगराध्यक्ष जानराव गिरी ,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बाळू धुमाळ,शहराध्यक्ष प्रकाश खुडसंगे प्रसाद ठाकरे आदी उपस्थित होते दादांनी राष्ट्रीय महामार्गलागत असलेल्या अभिमान बोभाटे याचे शेताची पाहणी केली तसेच त्यांचेशी संवादही साधला शेतात मोठ्या प्रमाणात दगड येऊन पडल्याने अलीकडच्या काही वर्षात शेत कसने कठीण असल्याचे दादांनी सांगितले तसेच राष्ट्रीय महामार्गावर असलेला पूल चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आल्याने शेताचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचे दादांनी यावेळी सांगितले तसेच बंधारा बांधून भविष्यातील नुकसान टाळता येऊ शकते असेही दादा यावेळी बोलले ,सोबतच आता झालेले नुकसान हे जास्त आहे त्यामुळे नेहमीच्या तोकड्या मदतीने हे नुकसान भरून निघणार नाही त्यामुळे विशेष व जास्त मदत यावेळी शेतकऱ्यांना केली पाहिजे व तशी मागणी आपण सभागृहात व सरकारकडे करणार असल्याचे सांगितले खरडून गेलेल्या शेतीसाठी वेगळी मदत आपण मागणार असल्याचेही दादा यावेळी बोलले तसेच पिकविम्यची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांना मिळावी यासाठी आपण सभागृहात पाठपुरावा करू असे यावेळी सांगितले।। विधान सभेचे विरोधी पक्षनेते मा. ना. अजित दादा पवार पूर परिस्थिती पाहणी करिता राळेगाव तालुक्यात आले असता राळेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राळेगाव व सरपंच संघटना राळेगाव यांच्या वतीने देण्यात आले