
नांदेड – स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्षपदी तिरुपती पाटील भगणुरे यांची पुर्ननिवड करण्यात आली तर दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी सदा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. प्रा. रेणुकाताई मोरे, प्रदेश कोषाध्यक्ष डॉ. गजानन भाऊ माने , प्रदेश कार्यकारी सदस्य मंगेश पाटील कदम, प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत पाटील मुळे , विभागीय संघटक गणेश पाटील काळम ,विभागीय कार्याध्यक्ष जनार्दन पाटील वडवळे, लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष बालासाहेब कदम , नांदेड जिल्हा संपर्क बालाजी पाटील कराळे यांच्या उपस्थितीत नूतन कार्यकारणीचे निवड करण्यात आली.
स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड नांदेड जिल्हा आढावा बैठक घेण्यात आली व रिक्त पद देण्यात आले. यावेळी विचार मंचावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर, महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष डॉ प्रा रेणुकाताई मोरे, प्रदेश कोषाध्यक्ष डॉ. गजानन भाऊ माने, प्रदेश कार्यकारी सदस्य मंगेश पाटील कदम, प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत पाटील मुळे, विभागीय संघटक गणेश पाटील काळम, विभागीय कार्याध्यक्ष जनार्दन पाटील वडवळे, लातूर जिल्हा अध्यक्ष बालासाहेब कदम, नांदेड जिल्हा संपर्क बालाजी पाटील कराळे हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी खालीलप्रमाणे निवडी करण्यात आल्या.
