
प्रतिनिधी ढाणकी (प्रवीण जोशी)
शहरी भागासह ग्रामीण भागात अन्नपदार्थाची विक्री करणारे अनेक लहान मोठे व्यवसायिक आहे व तशी नोंदणी अन्न व औषध प्रशासनाकडे केली आहे पण अन्न आणि सुरक्षा व मानदक प्रणालीवर नोंदणी करताना देण्यात आलेले दूरध्वनी क्रमांक किंवा मेल आयडी किंवा बंद असलेले अथवा काही तांत्रिक अडचणीमुळे ही माहिती देणारी सुविधा बंद आहे त्यामुळे शासनाने वेळोवेळी घेतलेले निर्णय आदेश व सूचना व्यावसायिकांना मिळणे कठीण झाले असल्याने अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने ढाणकी येथे 30 जुलै रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक लहान मोठ्या व्यापारी बांधवांनी आपले मोबाईल नंबर व मेल आयडी नोंदणी केली व नियमित चालू असलेला नवीन नंबर व मेल आयडी देणाऱ्या व्यावसायिकांना त्यांच्या परवान्याचे पासवर्ड बदलून देण्यात येणार असल्या कारणाने ढाणकी येथील व्यावसायिकांनी या शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद दिला व परवानाधारक अन्न व औषध विक्रेते यांनी आपले नंबर व मेल आयडी याचे नोंदणी करण केले यावेळी अन्न व सुरक्षा अधिकारी गोपाल माहुरे व सहाय्यक आयुक्त कृष्णा जयपुरकर उपस्थिती होते
शिबिरात तीस व्यवसायिकांनी नोंदणी केली आहे यावेळी ढाणकी किराणा युनियन चे अध्यक्ष अतुल येरावार व समस्त व्यापारी बांधव उपस्थिती होते
