
हिमायतनगर प्रतिनिधी:परमेश्वर सूर्यवंशी
नांदेड जिल्ह्यात सर्वात जास्त अतिवृष्टीमुळे हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शेतीसह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे ह्याची मी स्वतः अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेती बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली व महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन स्वतः मी तालुक्यातील 90 ते 100% नुकसान झालेल्या सोयाबीन सह आदी पिकांचे अहवाल त्यांना दाखवले त्यामुळे हदगाव हिमायतनगर तालुका ओला दुष्काळ जाहीर करून येथील शेतकऱ्यांना हेक्टरी 75 हजार रुपयाची मदत जाहीर करावी अशी मागणी आमदार माधवराव पाटील जळगावकर यांनी दि 7 ऑगस्ट रोजी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेच्या बैठकीत सांगितले व हर घर तिरंगा मोहीम तालुक्यातील अधिकाऱ्यानी व नागरिकांनी अधिक व्यापक करावे असे आव्हान सुद्धा केले
याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक सात ऑगस्ट रोजी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील सभागृहात हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील यांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये हिमायतनगर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे त्यात तालुक्यातील 883 घरांच्या पडझडी झाल्या व शहरातील 70 ते 80 घरांचे पाऊसाच्या पाण्याने नुकसान झाले तर तालुक्यातील वडगाव ,आंदेगाव, सवना ,मंगरूळ सह आदी गावचे रस्ते पुराच्या पाण्याने पूर्ण खचून गेल्याने तेथील गावचा संपर्क थोड्या पाण्याने तुटत आहे ते पुल तात्काळ दुरुस्त करून त्यांना शासनाकडून तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा व तालुक्यातील शेतकऱ्यांचे बँकांमधील प्रलंबित असलेले शेतीविषयक प्रश्न तात्काळ निकाली काढून हदगाव हिमायतनगर तालुका ओला दुष्काळ जाहीर करून येथील शेतकऱ्यांना हेक्टरी 75 हजार रुपयाची मदत जाहीर करावी अन्यथा येणाऱ्या अधिवेशनात आम्ही आवाज उठवू असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले त्यानंतर उपस्थित पत्रकारांनी शहरातील कनकेश्वर तलाव येथील विसर्जन कुंड पाऊसाच्या पाण्याने ढासळून गेला तो तात्काळ दुरुस्त करण्यात यावा अशी विनंती केली असता त्यांनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांना फोन करून तो प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या त्याचबरोबर उपस्थित पत्रकारांनी ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मनमानी पणाच्या व्यथा सुद्धा त्यांच्यासमोर मांडल्या त्यामुळे उपस्थित पत्रकारांना असे सांगितले की जे कर्मचारी मुख्यालयी राहतो म्हणून आपले मानधन शासनाकडून उचलतात त्या कर्मचाऱ्यांनी मुख्यालयीच राहावे अन्यथा अर्धापूर ची पुनरावृत्ती आपल्या हिमायतनगर तालुक्यात करावी लागेल असे त्यांनी सांगितले व मी ग्रामीण रुग्णालयासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा शासनाकडून पुरवत आहे त्यामुळे अधिकाऱ्यांनी रुग्णांच्या बाबतीत हलगर्जीपणा करू नये अन्यथा याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील असे त्यांनी सांगितले
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश वानखेडे, माजी तालुकाध्यक्ष जनार्दन ताडेवाड, जिल्हा परिषद सदस्य समद खान, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रफिक शेठ, काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान पठाण, शहराध्यक्ष संजय माने ,प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे, सूर्यवंशी सर, दिलीप राठोड,शिवाजी पाटील, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष फेरोज खुरेशी ,बाकी सेठ, युवा कार्यकर्ते योगेश चिल्कावार, प्रशांत देवकते ,दीपक कात्रे, सह आदी कार्यकर्ते व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
