
_माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात दहाविच्या परिक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ वरोरा द्वारा संचालित कर्मवीर विद्यालय कोसरसार ची कु. प्राजक्ता प्रमोदराव बुरांडे (88.00%)या विद्यार्थिनीने 10 शाळांच्या संस्थेमधून प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यात प्राजक्ताच्या अभूतपूर्व यशामुळे वरोरा शहरामध्ये कर्मवीर विद्यालय कोसरसार या शाळेचे नावं उंचावले आहे. या यशामागे पालकांचे व शिक्षकांचे मोठे योगदान आहे. यात ग्रामीण सेवक सह.पत संस्था मर्या वरोरा तर्फे मा. डाॅ. विजयरावजी देवतळे साहेब यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये उपस्थित ग्रामीण शिक्षक प्रसारक मंडळ वरोरा चे अध्यक्ष डॉ.वि.रा.देवतळे, उपाध्यक्ष श्री.सो.म.भोंगळे, सचिव. श्री.गो.घ.ऐकरे, श्री.ना.गो.थुटे, श्री.रा.स.डाहारकर, श्री.प्र. भ.मुथा, श्री.दि.स.ठेंगणे, श्री.उ.श्री.झाडे, श्री.रा.वा.देवतळे, सौ. रेखाताई कुरेकार व मुख्याध्यापक तथा शिक्षक वर्ग आणि पालक वर्ग या कार्यक्रमाला उपस्थित होते.
