ढाणकी फुलसावंगी महामार्ग वाहतुकींसाठी बंद

ढाणकी प्रतिनिधी प्रवीण जोशी

: ढाणकी फुलसावंगी राष्ट्रीय महामार्ग( 752 i) रस्ताचे काम चालु आहे पण फुलसावंगी पासुन दोन किलोमीटर अंतरावर नाल्यवार पुलाचे काम चालु बरेच दिवसा पासुन या पुलाचे काम चालु संबंधित ठेकेदाराने कासवगतीने काम चालु आहे. त्यामुळे चालु वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणुन पक्या स्वरुपाचा वळण रस्ता काडणे गरजचे असताना संबधीत ठेकेदाराने काटकसरीने वळण रस्ता काढल्याने जर थोडासा पाऊस आल्याणे वळण रस्ता वाहुन गेला . त्यामुळे नागरीकांना विविध कामाकरीता ढाणकी फुलसावंगी जाणे येणे बंद झाले. हा रस्ता फुलसावंगी ,महागाव, व माहुर, किनवट, कुपटी,बंजरा बहुल भाग ईवळेश्वर , मोहपूर, सिदगी, सारणी , इत्यादी भागामध्ये मायदयाळी वाहत आसते संबंधित राष्ट्रीय महामार्ग आधिकाऱ्या वेळीच दखल घेऊन हा रस्ता वेळीच अद्यावत करा अशी मागणी ढाणकी फुलसावंगी या भागातील जनता व प्रवाशी करीत आहे.