100 शालेय विद्यार्थांना पेन वही वाटप करून वाढदिवस साजरा
प्रेरणदायी उपक्रम


ढाणकी – प्रतिनिधी:प्रवीण जोशी


हल्लीच्या जमान्यात वाढदिवसानिमित्त मोठमोठया हाॅटेल,रेस्टाॅरंटमध्ये ओल्या व सुख्या पार्टीचे आयोजन करून आपल्या श्रीमंतीचा बडेजाव पणाचे प्रदर्षन करण्याचे अनेक उदा.देता येईल मात्र जिल्हा परिषद प्राथमिक षाळा ढाणकी येथे लहाणपणी शीक्षण घेतलेल्या ढाणकीतील तरूणांनी त्याच शाळेतील शिकणाऱ्या 100 विद्यार्थांना आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधुन पेन-वही वाटप करून समाजापूढे एक नवा आदर्ष ठेवला.
ढाणकी येथील ग्राहक सेवा केंद्र चालक मंगेष चौरे आणि आर.एस.एस.संघटनेचा कार्यकर्ता रविभा ऊ येकराळे यांचा आज दिनांक 27 जुलै 2022 रोजी जन्मदिवस आपण ज्या समाजात लहानाचे मोठे झालो त्या समाजाचे आपणाला काही देण लागतं.या उदांत हेतूने प्रेरीत होवून स्वखर्चांने 100 पेन व 100 वही विकत घेवून वि त्यांनी थेट ढाणकी जि.प.प्राथमिक षाळा गाठली.शाळेच्या मुख्याध्यापीका वनमाला जवळेकर यांना आपल्या मनोकामना बोलून दाखविल्या.या स्तुत्य उपक्रमाची पार्श्वभूमी लक्षात येताच आपल्या शाळेच्या सर्व शीक्षकांना व कर्मचाऱ्यांना एकत्र बोलावून शाळेच्या प्रांगणात दोन्ही माजी विद्यार्थ्याचा जन्म दिवस उत्सव साजरा करण्यासाठी छोटे खाणी कार्यक्रमाचे आयोजन केले.या कार्यक्रमाला ढाणकी येथील प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती लाभली.वर्ग 1 ला व दुसरा या वर्गात शिकणाऱ्या या 100 विद्यार्थांना वाढदिवसाचा औचित्य साधून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मोफत पेन व वहि वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्राचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल गोपाळा गायकवाड होते तर प्रमुख उपस्थितीत केंद्रप्रमुख रामदास केंद्रे ,वंचित बहूजन आघाडाची यवतमाळ जिल्हा महासचिव जाॅन्टी विणकरे,नगरसेवक उमेष योगेवार,सामाजीक कार्यकर्ता पंकज केशेवाड,श्री.हाके शाळेच्याळेच्या मुख्याध्यापीका वनमाला जवळेकर इत्यादी मान्यवर हजर होते.या तरूणांनी अतिशय साध्या पध्दतीने समाजाला योग्य दिषा देणारा उपक्रम हाती घेवून शालेय विद्यार्थांना पेन व वहि वाटप करून वाढदिवस साजरा करणे म्हणजे सामाजीक दा ईत्व निभावणे होय.हा उपक्रम समाजाला प्रेरणा दायी ठरेल अषी भावणा व्यक्त केली.तसेच जाॅन्टी विणकरे यांनी मंगेष चौरे व रविभा ऊ येकराळे यांना भावी आयुष्याबद्दल भरभरून षुभेच्छा दिल्या.यावेळी श्रीमती अरूणा इरलेवाड,श्रीमती सुरेखा शी,श्री.गोकुळ राठोड अविनाश केंद्रे इत्यादी शीक्षकांनी अथक परीश्रम घेवून या उपक्रमासाठी हातभार लावला.