बिटरगांव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुजाता बन्सोड यांच्या बदलीसाठी ढाणकी शहरं कडकडीत बंद

प्रतिनिधी :शेख रमजान बिटरगांव बु


ढाणकी बिटरगाव ठाणेदार यांच्या बदली वर गावात चांगलाच गदारोळ चालला आहे .ठाणेदार सुजाता बनसोड ढाणकी मध्ये रुजू झाल्यावर सुरवातीला त्यांनी अवैध धंदे मटका , दारू , गुटका व रेती यावर लगाम कसला होता . पण काही महिन्यातच ठाणेदार यांनी ढाणकी गावात अवैध धंदे मटका , दारू , गुटखा खुले आम चालू ठेवला व गावातील शांतता कमेटी वरील अविस्वास व गावातील नागरिका सोबत उद्धट वागणुकीमुळे व ठाणेदारच्या या व्यहारामुळे गावातील सर्वपक्षीय एकत्रित येऊन ढाणकी बिटरगाव ठाणेदार यांची बदली करण्याची मागणी पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या कडे केली होती .ठाणेदाराची बदली करणे बाबतचे निवेदन पोलीस अधीक्षक यवतमाळ दि. २३/११/२०२३ रोजी देण्यात आले होते. त्यात नमुद केल्याप्रमाणे पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी निवेदनाकडे दुर्लक्ष करून अधिकाऱ्यास पाठीसी घातले जात आहे का? अशी शंका उपस्थित करत ०१ डिसेंबर २०२३ शुक्रवार रोजी ढाणकी बाजारपेठ बंद ठेवुन जुने बसस्टैंड येथे लोकशाही मार्गाने आंदोलन केले .या आंदोलनला मोठया संख्येने गावातील नागरिकांनी व व्यापारांनी आपली दुकानें बंद करून या आंदोलनाला पाठिंबा दिला .
ढाणकी गावाची कायदा सुव्यवस्था न बिगडवता व कोणतेही पोलीस बंदोबस्त नसताना ढाणकी आंदोलन कर्त्यांनी गांधीगिरी मार्गाने आंदोलन पार पाडले .


सुजाता बनसोड ठाणेदार यांनी ढाणकी मध्ये पतीराज चालवत गावातील कायदा सुव्यवस्था बिगडवली आहे. त्या कारणाने आम्ही सगळे समाजाचे नागरिकांने त्यांच्या बदली साठी आंदोलना पाठिंबा दिला आहे .तसेच त्यांनी लोकाना आव्हान करत प्रशासकीय अधीकारी यांना जात नसते पण काही लोक अधीकारी विसिष्ठ जातींचे असे सांगत जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे . ज्या गावात सर्व जातीय धर्म गुण्या -गोविंदाने राहतात तेथे कोणत्याच जातीचा भेद -भाव नाही अशा ठिकाणी जातीवाद करणाऱ्या सापाना आंबेडकरी लोकांनी त्याच ठिकाणी ठेचण्याचं काम करावे असे आव्हान करतात


जाँटी विणकरे आंबेडकरी कार्यकर्ते


ठाणेदार अवैध धंद्याला परवाना देऊन त्यातून अर्थसाय मिळणाचे काम करत आहे


मा जिल्हा प. सदस्य रमेश गायकवाड


ढाणकी ठाणेदार हे हम करे सो कायदा चालवत असून ते गावातील कायदा सुव्यवस्था बिगडवत आहे त्यामुळे त्यांची लवकरात लवकर बदली करावी


उमरखेड बाजार समिती सभापती बाळू पाटील चंद्रे