
प्रतिनिधी ढाणकी:( प्रवीण जोशी)
दि. 18 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण गोकुळाष्टमी निमित्त ढाणकी येथून विश्व हिंदू परिषद प्रेरित बजरंग दल यांनी भव्य दिव्य कावड यात्रा चे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात ढाणकी येथून कावड यात्रा काढण्यात आली व गांजेगाव येथील पैनगंगा नदीचे पाणी घेऊन कावड ही अमृतेश्वर संस्थान हरदडा येथे कार्यक्रमाची सांगता झाली.ढोल पथक,भजनी मंडळ,रथ व युवकांचा उत्साह यांनी ढाणकी नगरी दुमदुमली. गावातील व बाहेरगावातील तरुणांनी यात विशेष सहभाग घेऊन भव्य दिव्य कावड यात्रा चे आयोजन केले होते. यात गांजेगाव, बिटरगाव, कृष्णापुर , सोइट, ब्राह्मणगाव, हरदडा,व इतर आजूबाजूनची गावे होती.दरवर्षी कावड यात्रा ही ढाणकी ते गांजेगाव पैनगंगा नदीचे पाणी घेऊन हरदडा इथे सांगता होयायची,परंतु गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या नियमाचे पालन करत दोन वर्ष कावड यात्रा ही जमेल त्या उत्साहात काढण्यात आली नव्हती. त्यामुळे या वर्षी शासनाचे नियमाचे पालन करत अतिऊत्सहाने तरुणात आनंदाचे डोई आनंद तरंग या अभंग प्रमाणे आनंदात कावड यात्रा पार पडली.यात ढाणकी व आजूबाजूच्या गावातील बजरंगी उपस्थित होते.
