ढाणकी/ प्रतिनिधी :
ढाणकी येथील महावितरणच्या सहाय्यक आभियंत्याची दि. ४ ऑगस्ट रोजी, पुसद येथील कार्यकारी अभियन्ता आडे आणि सहकारी कर्मचारी यांनी भेट देऊन तब्बल १३ तास विभागीय चौकशी केल्याची चर्चा ढाणकी शहरात मोठ्या प्रमाणात रंगली आहे.
ढाणकी येथील शेतकरी मुकुंद आनंदा हाळदे, शेतकरी साहेबराव मारोती सुरोशे, शेतकरी बालाजी कानोबा सुरोशे यांनी आपल्या शेताला ओलीत करण्याकरिता रीतसरपणे महावितरण कंपनी ढाणकी येथे अर्ज केला. त्याचे रीतसरपणे कोटेशन सुद्धा भरले. परंतु महावितरण च्या सहाय्यक अभियंत्याने शेतकऱ्याकडून ४५००० ते ५०००० रुपये घेतले. कंत्राटी कामगार आणी अभियन्ता यांनी मिळून कंपनी च्या सिस्टीमशी छेडछाड करून कोटेशन पावती शेतकऱ्याला बोगस पध्दतीने देत रीतसर प्रमाणे वितरण विभागाने ठरून दिलेले कोटेशन भरत होते. मात्र शेतकऱ्याकडून दुपट पैसे घेऊन बोगस पावती दिल्या जात होती. व वितरण कम्पनीची आर्थिक लूट करत होते. अशी चर्चा आहे.
महावितरण कार्यालय ढाणकी येथील आर्थिक लुटीची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना होताच, ते चौकशी करीता ढाणकी येथे आले असता, अनेक शेतकरी यांनी आपण भरलेल्या शेती पम्पाची कोटेशन पावती घेऊन महावितरण कार्यालय गाठले. आणि कार्यकारी अभियन्ता यांच्या कडे पावत्यांची शहनिशा करून घेत होते.
महावितरण कम्पनी कलम १३५ प्रमाणे विना कोटेशन घेता, विद्युत वापरत असल्याच्या कारणावरून सुद्धा अनेक शेतकऱ्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्यायचे ओरड शेतकरी करत आहेत. याची सुद्धा चौकशी करण्याची मागणी केल्या जात आहे.
महावितरण कार्यालय ढाणकी च्या सहायक अभियंत्याने आणि कंत्राटी कामगार यांनी केलेला आर्थिक अपहार, चालू असलेली विभागीय चौकशी मधून सत्य बाहेर येईल कि जागेवर दाबल्या जाईल? याची चर्चा शेतकरी विद्युत ग्राहक करीत आहेत. सहाय्यक अभियन्ता आणी कंत्राटी कामगार यांनी आपल्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली. याची सुद्धा चौकशी करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
चौकट–
सहायक अभियन्ता ढाणकी यांनी केलेल्या आर्थिक लुटी च्या विभागीय चौकशी करीता वरिष्ठ स्तरावरून टीम ढाणकी कार्यालयात आली होती, परंतु अद्याप प्रयन्त कोणताही ठोस अहवाल कार्यालयास प्राप्त झाला नसल्याचे दुरध्वनीवरून सांगितले.
वाघमारे, उपकार्यकारी अभियन्ता
ढाणकी महावितरण कार्यालय.
