
ढाणकी: प्रतिनिधी (प्रवीण जोशी)
जिद्द आणि कर्मातील प्रयोगशील सातत्य ठेवल्यास यश नक्की मिळते हे यशाचा मूलमंत्र लक्षात घेऊन आपले प्रयत्न सूनिताने चालू ठेवले आर्थिक चणचण प्रगतीचा मोठा शत्रू आहे .मध्यमवर्गीय पालक आपल्या मुलाला मनात असूनही फक्त पैशाच्या अभावी योग्य ती शिक्षन देऊ शकत नाहीत. मध्यमवर्गीय घरातील मुलांना बालपण आणि शिक्षण अनुभवता येत नाही. या सर्व गोष्टीवर मात करीत सुनितांनी सर्वसाधारण आर्थिक सुबत्ता असलेल्या परिवारामध्ये जन्म घेतलेल्या मुली पण शिक्षण घेऊन नोकरी करू शकतात हे सिद्ध केले. ढाणकी इथून काही अंतरावर असलेल्या मन्याळी या गावातील सुनीता जाधव हीची ठाणे पोलीस कॉन्स्टेबल पदी निवड झाली. घरची परिस्थिती जेमतेम आई वडील शेतकरी गाव हे अतिशय दुर्गम भागातील बसची सोय नाही किंवा वाहने सुद्धा नाहीत.गावात जाण्यासाठी , येण्यासाठी रस्ता ही चांगला नाही. अशा परिस्थितीत मामाच्या गावी शिक्षणाची सुविधा असल्याकारणाने सुनिताने १ते७ हे शिक्षण आपल्या मामाच्या गावी घेतले. ८ ते ९ हे शिक्षण कस्तुरबा गांधी कन्या विद्यालय ढाणकी येथे घेतले. व १० ते १२हे शिक्षण वसंतरावजी नाईक कृषी विद्यालय बिटरगाव येथे झाले. लहानपणापासूनच सुनितास शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात आवड होती. शिक्षण चालू असताना जिल्हास्तरीय पातळीवर जाऊन कबड्डी, लंगडी अशा क्रीडा क्षेत्रात तिने प्रथम क्रमांक पटकावीत असे. ठाणे पोलीस स्टेशन मध्ये २०२२ मध्ये तिची निवड झाली. परीक्षेत सुनिता १०० पैकी ८२ गुण मिळाले व ग्राउंड मध्ये ५०पैकी ४६ गुण मिळाले.एकूण १५० पैकी १२८गुण मिळवून सुनिता तिसरा क्रमांक मिळाला. याचे श्रेय ती आई वडील ,भाऊ ,शिक्षक वृंद ,व मित्र परिवारास देत आहे.या मुळे सुनिताचे गावभर कौतुक होत आहे.
