
प्रतिनिधी :प्रवीण जोशी (ढाणकी)
शेतकरी आर्थिक मदत मिळण्याच्या प्रतिक्षेत
उमरखेड तालुक्यातील : गेल्या काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे नदी नाल्यांना प्रचंड पूर आला आणि अनेकांची जीवितहानी, वित्तहानी झाली. उमरखेड तालुक्यात येथे पैनगंगा नदी आणि नाले तुडुंब भरल्या गेले होते. पिकांमध्ये अक्षरशः नदिचे स्वरूप आले असून भात पिकाचे, तूर, कापूस व इतर पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतपिके जळून व खरडून गेली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली आणि त्यावरही अतिवृष्टीमुळे तिबार पेरणीचे संकट उद्भवले आहे. शेतातील बचावलेल्या पिकांची अतिवृष्टीमुळे वाढ थांबली असून हाती काहीच लागणार नसल्याचे चित्र समोर दिसत आहे. नुकतेच महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टी जाहिर करून आर्थिक मदत देणार असल्याचे सांगितले आहे. गावपातळीवरून शासनाकडे अहवाल सादर होऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकर आर्थिक मदत मिळावी आणि आलेले आर्थिक संकटाला हातभार लागावा या प्रतिक्षेत शेतकरी बांधव आहेत. तेव्हा पोळा हा शेतकऱ्याचा अत्यंत जिव्हाळ्याचा सन असून काही दिवसांवर येऊन ठेपलाय त्या अनुषंगाने तत्काळ मदत करावी असे त्यांनी आमच्या प्रतिनिधी शी बोलताना सांगितले
