ढाणकी शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट संबंधित यंत्रणा सुक्त अवस्थेत

प्रतिनिधी: प्रवीण जोशी,ढानकी

ढाणकी शहरात सध्या मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला असून त्यात बकऱ्या गाई वळू यांनी अक्षरशः उछाद मांडला असून यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा मात्र कुठे निद्रावस्थेत आहे हे कळायला मार्ग नाही नगरपंचायत मधील लोकप्रतिनिधींना हे मोकाट जनावराचे त्रिकाल बाह्य धगधगते वास्तव दिसत नाही का ? असा प्रश्न शहरवासीयांना पडतो आहे .स्टेट बँक परिसर जुने बस स्थानक कृषी उत्पन्न बाजार समिती आणि भुसार दुकाने परिसर इत्यादी भागांमध्ये अक्षरशः बकऱ्यांचा कळप फिरताना दिसतो आहे. याचा त्रास संबंधित व्यापाऱ्यांना होत असून या जनावरांना पकडून योग्य ती विल्हेवाट लावणे आवश्यक बनले आहे तसेच गावातील अनेक ठिकाणी किमान डझन भर जनावरांचा कळप नेहमीच रस्त्यावर बसत असतो त्यामुळे भर रस्त्यावर ये जा करणाऱ्या वाहनधारक प्रवासी वर्गाला पायी चालणाऱ्या वृद्धांना महिलांना पुरुष व शाळकरी लहान मुला मुलींना याचा दररोजच नाहक त्रास होत आहे तर हा कळप भर रस्त्यात उभा असल्याने शहरातील दुचाकी चार चाकी वाहने घेऊन जात असताना येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांना धडक देऊन लहान-मोठे अपघात सुद्धा होऊ शकतो तसेच या मोकाट जनावरांमुळे शहरासह अनेक गाव खेड्यातील लोक व प्रवासी वर्गांना सुद्धा याचा नाहक त्रास नेहमीच होत आहे. स्टेट बँक परिसर जुने बस स्थानक या ठिकाणी नेहमीच मोकाट जनावरांनी गजबजलेला असतो व यामुळे नेहमीच वाहतुकीची कोंडी होऊन किमान अर्धा अर्धा तास रहदारी सुरळीत होण्यासाठी लागते नगरपंचायतचे मुख्य अधिकारी यांनी मोकाट जनावराच्या प्रश्नाकडे गंभीरतेने लक्ष घालून हा प्रस्न सोडवण्याचा असताना हा विषय नियमित रेंगाळत असल्याने जनतेला याचा नाहक त्रास होत आहे या बाबीवर नियंत्रण नसल्यामुळे मोकाट जनावरे रस्त्यावर येऊन कोणाचातरी बळी येणाऱ्या काळात घेईल का ? असा उलट प्रश्न शहरातील सुजान नागरिकांतून व्यक्त होत आहे .तसेच शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा या जनावरांचा त्रास होत असून याचा वेळीच बंदोबस्त व्हायला हवा अशी चर्चा शहरवासीयांमध्ये आहे