
ढाणकी प्रतिनिधी (प्रवीण जोशी)
पोळा सण जवळ आला असून बैल सजविण्याचे विविध साहित्य बाजार पेठेत दाखल झाले, शेतकऱ्याकडुन विविध साहित्य खरेदी होताना बघायला मिळत आहे. पोळा सणा सर्वांचे लक्ष लागले आहे, कोरोनाचा संकट संपल्याने सर्वाच धार्मिक सण उत्सव आता मोठ्या उत्साहात साजरे होत, आहे .जगाचा पोशिंदा असलेला शेतकऱ्याचा सण म्हणजे पोळा हा सण अवघ्या काही दिवसात आहे, बाजारपेठे मध्ये सर्जा राजा दाखल झाला आहे, व पोळा सणासाठी मातीचे बनवलेले बैल व बैल जोड्या विक्रीसाठी दाखल झाल्यामुळे रंगबिरंगी लहान मोठे बैल जोड्या आकर्षक ठरत आहे, पोळा सणासाठी या अनुसरून ढाणकी येथील बाजारात बैलांच्या सजावटीचे, घुंगराची, घंटी व बैलाच्या अनेक व विविध प्रकारचा साज विक्रीसाठी आला आहे. पोळा सणाचा तयारीसाठी शेतकऱ्याचे लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकरी बैलांना साज विकत घेण्यासाठी बाजारात येत आहे.
