देशसेवेत असणाऱ्या जवानांना सीमेवर राखी पाठविली,कस्तुरबा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ढाणकी चा स्तुत्य उपक्रम

प्रतिनिधी प्रवीण जोशी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त कस्तुरबा गांधी कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी वाघा सीमेवरील देशाच्या रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी स्वतः राख्या बनवून सीमेवर पाठवण्यात आल्या . जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी लोकांसाठी चालवण्यात आलेला लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा येथे आदिवासी लोकांच्या शिक्षण व कल्याणासाठी झटणाऱ्या डॉक्टर विकास आमटे व त्यांचे स्वयंसेवक यांच्याकरता राख्या पाठवण्यात आल्या तसेच आनंदवन येथील कुष्ठरोग्याचे निर्मूलनासाठी अहोरात्र झटणारे डॉक्टर प्रकाश आमटे व व सर्व स्वयंसेवक डॉक्टर व कुष्ठरोगी यांना राख्या पाठवण्यात आल्या तसेच गेवराई येथे सहारा अनाथालय मध्ये असलेल्या अनाथ चिमुकल्यांना राख्या पाठवण्यात आल्या या नव ऊपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस बी शिंदे मॅडम व पर्यवेक्षक श्री वाघमारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमशील शिक्षक श्री ए ए अलोने सर यांनी हा उपक्रम राबविण्यात आला