करंजी येथे स्वराज मोहत्सव निमित्त प्रभात फेरी सह विविध कार्यक्रमाचे आयोजन


ढाणकी – प्रति(प्रवीण जोशी)


जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा करंजीच्या वतीने स्वराज महोत्सवाचे औचित्य साधुन दि.08 ऑगस्ट 2022 पासून 17 ऑगस्ट 2022 पर्यंत प्रभात फेरी सह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
स्वातंत्राचा अमृत महोत्सव साजरा करतांना विद्यार्थ्यासह नागरीकांच्या मनामध्ये देश प्रेमाची भावणा निर्माण व्हावी स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या स्वातंत्र विरांनी प्राणांची आहूती देवून स्वातंत्र्य मिळविले त्यांच्या बद्दल देशवासीयांच्या मनामध्ये कृतज्ञता बाळगण्याची जिज्ञासा कायम राहावी व देशा प्रति एकनिष्ठ राहण्याची सदैव इच्छा निर्माण व्हावी यासाठी भारत सरकारच्या वतिने हर घर तिरंगा घर घर तिरंगा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण भारतभर साजरा होत आहे.त्या अनुषगाने करंजी गावामध्ये जिल्हा जिल्हापरिषद उच्च प्राथमिक शाळेच्या वतीने मुख्याध्यापक रवी काटोले व सर्व शिक्षक वृंद यांनी 8 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रमाचे नियोजन करत सर्व मुले मुली षिक्षक यांनी गावाच्या मुख्य रस्त्यांनी बॅंण्ड बाजा हे पारंपारीक वाद्य वाजवून देश अभिमानाचे घोषवाक्य देत परीसर निनादून टाकला.
गावातील प्रतिष्ठित नागरीकांना पाचारण करून लोकसहभागातून व श्रमदान करून शाळेचा परीसर स्वच्छ केला.त्यानंतर माजी सैनिक आणि गावातील प्रतिष्ठित नागरीक यांना आमंत्रीत करूण विद्यार्थ्यांना त्यांचे मार्गदर्शन ऐकवीले.9 ऑगस्ट या जागतीक आदिवासी दिनाच्या निमित्ताने बिरसा मुंडा यांना अभिवादन केले.दिनांक 11 ऑगस्ट रोजी गावातील कर्तबगार पुरुषांची ओळख आणि राष्ट्राचा स्वातंत्र्य पूर्वीचा इतीहास जाणून घेण्यासाठी वक्त्याचे व्याख्यान ठेवण्यात येणार आहे.12 ऑगस्ट रोजी आजची यूवा पिढी मोबाईलच्या आहारी जात असल्यामुळे मोबाईलच्या अतिवापराने होणारे दुष्परिणाम व अर्थ साक्षरता या विषयी शिबिर घेण्यात येणार आहे.
13 ऑगस्ट रोजी गावातील दान शुर व्यक्ती गजानन गावंडे यांच्याकडून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गोपाळाची पंगत देण्यात येणार आहे.त्यासाठी रूचकर जेवणाच्या मेजवाणीचा विद्यार्थी आस्वाद घेतील.
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी निसर्गाचे रक्षण करूण प्लास्टीक वस्तू वापरणार नाही.वृक्ष लागवड करू आणित्याचे संवर्धन करू तसेच वृक्षतोड, शिकार,वनवा,यापासून निसर्गाला वाचवू अशी विद्यार्थी व गावकरी पर्यावरण सवंर्धनाची षपथ घेतील.15 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता बॅण्ड बाजाच्या पथकासह विद्यार्थी गावातील मुख्य रस्त्यांनी प्रभाग फेरी काढतील आणि ध्वजारोहना नंतर विद्यार्थ्यांमध्ये विविध शालेय स्पर्धा होणार आहेत.दिनांक 16 किशोरी मेळावे आयोजीत करून वैद्यकीय अधिकारी व समुपदेशक यांच्या मार्फत आरोग्य विशयक समुपदेषन होईल.