
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड
फळबागेचे क्षेत्र वाढीसाठी राज्यात सध्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून फळबाग लागवड सुरू होत्या.मात्र गेल्या दोन वर्षांपासून राज्यपुरस्कृत भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना बंद असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे जाॅब कार्ड नाही.त्यामुळे बहुभूधारक शेतकऱ्यांना फळबाग लागवडीच्या सरकारी योजनेपासून वंचित राहावे लागत आहे.भाऊसाहेब फुंडकर योजनेतून फळबाग लागवड करण्यासाठी महाडीबीटी अंतर्गत ऑनलाईन अर्ज मागवले जातात.पात्र लाभार्थ्यांकडून एप्रिल महिन्यात प्रस्थाव जायाचे.मात्र गेल्या दोन वर्षांपासून प्रस्थावच मागविले नाहीत.त्यामुळे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना कागदावरच असल्याचे दिसत आहे.पीक व पशुधनाबरोबरच फळबागेच्या रूपाने शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात १९९० पासून रोजगार हमी योजनेशी निगडित फळबाग लागवड योजना राबवली जात आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत पात्र नसलेल्या व जाॅब कार्डधारक पाच एकराच्या आतील अल्प व अत्यल्य भूधारक शेतकऱ्यांना फळबाग लागवडसाठी अनुदान दिले जात होते.ही योजना बंद असल्याने फळ लागवड करणार्यां शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे.महराष्ट्रातील काही जिल्ह्यातील गेल्या चार वर्षांपासून अनेक उस उत्पादक शेतकरी फळबाग लागवडीकडे वळले आहेत.शेतक-याना फळबाग लागवडीसाठी अनुदान मिळावे यासाठी राज्यात २०१८-१९च्या खरीप हंगामापासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राज्य पुरस्कृत योजना सुरू करण्यात आली आहे.एक हेक्टरसाठी साधारण ५३हजार रुपयांपासून योजनेतून मिळते.गेल्या दोन वर्षांपासून मात्र ही योजना बंद आहे.त्यामुळे आमचे फळबाग लावण्याचे नियोजन असूनही लागवड करता येईना.अन्य सर्व योजना सुरू आहेत.त्यामुळे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू करण्यात यावी.अशी मागणी राज्यशासनाकडे करण्यात आली आहे.असे शिवस्वराज्य युवा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष परमेश्वर पाटील भिमलवाड यांनी म्हटले आहे.
