


चंद्रपूर जिल्ह्यातील कला क्षेत्रात अमूल्य असे योगदान आहे.त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात वेगवेगळ्या विषयांवर लघुपट तयार होत आहेत.असाच एक लघुपट दिग्दर्शक झहीर काझी व आलीया खान यांनी तयार केला आहे.
सामान्य कुटुंबातील बहीण भावाच प्रेम नात्यात येणाऱ्या अडचणी या सर्व विषयाला अनुसरून हा लघुपट तयार करण्यात आला आहे.या चित्रपटात मुख्य भूमिकेत महेश बावणे वरोरा व जीविका पोंनलवार ही चंद्रपूर येथील आहे .तसेच सहकलाकार म्हणून जय यादव , बिरबल रॉय ,शुभम पाटील ,पंकज कोरडे , उमर शेख ,प्रज्वल वैद्य,शुभम कातोरे,झिशान ,निलेश जम्पलवर अंकुश झाडबुके व इतर कलाकारांनी अभिनय करीत लघुपट तयार केला. लघुपट तयार होण्यास 14 दिवसांचा कालावधी लागला .पावसामुळे या लघुपटाला पूर्ण व्हायला वेळ लागला अन्यथा हा लघुपट रक्षाबंधनालाच प्रदर्शित करायचा होता असे सांगण्यात आले..या लघुपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून हा संपूर्ण लघुपट चंद्रपूर शहरातील कुंदन प्लाझा (tri star hotel) व शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी शूट झाला असून येणाऱ्या 20 तारखेला ZK studio या युट्युब चॅनेल ला प्रदर्शित होणार आहे.
