

प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा
नंदोरी गावाला लागून असलेल्या चौका मध्ये वरोरा कडून येणाऱ्या मोठ्या मालवाहू ट्रक चा चालक मद्यप्राशन करून होता त्यामुळे चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या किशोर उमरे यांच्या वेल्डिंग वर्कशॉप च्या शेड ला धडक दिल्याने शेड चे मोठे नुकसान झाले आहे.शेड ला धडक देऊन समोर असलेल्या प्लॉट मध्ये जाऊन हा ट्रक थांबला तिथे एक विद्युत खांब होता त्या खांबाला धडक देण्याआधीच हा ट्रक थांबल्याने मोठा अनर्थ टळला.हा ट्रक खांबाला धडकला असता तर मोठी जीवितहानी झाली असती असे प्रत्यक्षदर्शींनी लोकहीत महाराष्ट्र च्या प्रतिनिधी ना सांगितले.
