जामगाव येथील माणिक कळसकर यांच्यावर चाकूने हल्ला,आरोपीकडून दारूच्या नशेत असताना हल्ला

सहसंपादक:प्रशांत बदकी

लोकहीत महाराष्ट्र ग्रुप ला जॉईन करा

https://chat.whatsapp.com/L7EMtZ0F9qYA9NJ6uI1clY

दिनांक 20/05/2021 ला रात्री वरोरा तालुक्यातील जामगाव या गावातील कुणाल पिंपळशेंडे याने दारू पिऊन गावातील एका इसमासोबत वाद घातला त्यात कुणाल पिंपळशेंडे याला गावातील लोकांनी चांगलेच फैलावर घेत चोप दिला त्यामुळे रागात असलेला कुणाल पिंपळशेंडे याने गावातील चौकात येत तिथे असलेल्या माणिक कळसकर यांच्याशी वाद घालीत त्यांच्या मानेवर चाकूने हल्ला चढविला त्यात माणिक कळसकर हे गंभीर झाले असून त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले .तर आरोपी हा स्वतः ठाण्यात पायी जात असताना रत्नमाला चौक येथे त्याला संतप्त नागरिकांनी चोप दिला.या प्रकरणी पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.