श्री. हिरालाल चौधरी यांचे अभिनंदनिय सेवाभावी कार्य,धोबी महासंघ सर्व भाषीक च्या या पदाधिकाऱ्यांचे सेवाभावी कार्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

प्रतिनिधी:वरून त्रिवेदी ,वरोरा

वरोरा जवळील चिनोरा येथील सौ. पायल नितेश मंगेकर या मागील तीन दिवसांपासून प्रसववेदनेने अत्यंत त्रस्त होत्या. त्यांचा वरोरा येथील रुग्नालयात उपचार सुरू होता परंतु त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रक्ताची गरज भासली. तेंव्हा श्री किशोर केळझरकर चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य वरठी- परीट- धोबी समाज महासंघ सर्व भाषीक यांनी आपल्या सेवाभावी वृत्तीने त्यांना मदतीचा हात दिला. या कामी श्री. हरिभाऊ भाजीपाले तालुका अध्यक्ष यांनी सुद्धा सहकार्य केले.
परंतु त्यांना वरोरा रुग्णालयाने चंद्रपूर रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. तेंव्हा श्री. किशोर केळझरकर यांनी या परिवाराला धिर देत चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.
चंद्रपूर शासकीय रुग्णालयात सेवारत असलेले धोबी समाज महासंघ सर्व भाषीक चे विदर्भ उपाध्यक्ष श्री. हिरालाल चौधरी यांनी समाजाप्रती असलेली सद्भावना दर्शवून वेदनेने त्रस्त असलेल्या या गरीब महिलेकडे आत्मियतेने लक्ष देऊन योग्य उपचार करणेस मदत केली. या कार्यात त्यांचे लहान बंधु व जिल्हा उपाध्यक्ष श्री. पन्नालाल चौधरी यांचेसुद्धा मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या या कार्याला यश आले व आज शुक्रवार दि. २९.१.२०२१ ला दुपारी तीन वाजता या महिलेला कन्यारत्न प्राप्त झाले.
मंगेकर परिवारावर ओढवलेल्या या प्रसंगातून सावरणेसाठी मदतीचा हात पुढे केल्याबद्दल त्यांनी सर्वश्री. किशोर केळझरकर, हरिभाऊ भाजीपाले, हिरालाल चौधरी व पन्नालाल चौधरी यांना धन्यवाद देऊन आभार मानले आहेत.
‌‌धोबी महासंघ सर्व भाषीक च्या या पदाधिकाऱ्यांचे सेवाभावी कार्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.