
प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी, हिमायतनगर
हिमायतनगर| हिमायतनगर नगरपंचायतीअंतर्गत शेकडो बोअर (विंधन विहिरी) घेण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी बहुतांश बोअर हे पाणी असूनही मोटार पंप दुरुस्ती अभावी तर काहीबोअर बंद पडलेले आहेत. मात्र याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याने शहरात पाणी टंचाई सदृश्य परिस्थिती अनेक वॉर्डात निर्माण झाली आहे. हि बाब लक्षात घेता बंद पडलेल्या बोअरवरील मोटार पंपांची तात्काळ दुरुस्ती करून नागरिकांची तहान भागवावी आणि नव्याने होणारेय नळयोजनेचे बांधकाम दर्जेदार व सर्व प्रेयाभागात पाणी मिळेल या पद्धतीने जलकुंभाची निर्मिती व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल मादसवार, मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष गोविंद गोडसेलवार, शुद्धोधन हनवते यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
हिमायतनगर शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार २४ हजार ७४५ आहे. यामधे वाढ होऊन आता जवळपास ३० हजाराच्या आसपास झाली आहे. मागील ५ वर्षांपूर्वी ग्रामपंचायत असताना शहरात ४७ बोअर व सार्वजनिक विहिरी १२ तर हातपंप ५ असून, ते निकामी झालेले आहेत. या शहराची पाणी टांचणीसाठी १९४५ साली पैनगंगा नदीवरून घेतलेली नळयोजना अनेक वर्षांपासून बंद पडललेली आहे. त्यामुळे गरमपंचायत असताना शहरासाठी २ कोटी १८ लक्ष ६६ हजारांची नळयोजना पैनगंगा नदीवरून मंजूर झाली होती. तिया नळयोजना भ्रष्ट्राचारामुळे अर्धवट राहिली होती. २०१५ साली पहिली नगरपंचायत निवडणूक झाली तेंव्हापासून ५ वर्षाच्या काळात शेकडो बोअर (विंधन विहिरी) घेण्यात आले आहेत. मात्र अनेक वारंदातील बोअर नादुरुस्त आणि मोटारपंप बिघडल्याने बंद अवस्थेत आहेत. परिणामी महिला – पुरुष नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. वॉर्ड क्रमांक ४ मधील नागरिकांना तर दूरवरून शेतातून पाणी आणावे लागत असून, त्या विहिरीतून पाणी आणताना आपला जीव धोक्यात घालण्याची वेळ आली आहे. तर मध्यमवर्गीयांना अतिवृष्टी होऊन देखील ऐन हिवाळ्यात देखील पाणी विकत घेऊन घरगाडा चालवावा लागत आहे. शहराची तहान भागविण्यासाठी प्रत्येक नगरसेवकांना त्यांचा विशेष कोठ्यातून बोअरची निधी मिळाला मात्र त्याचा विनियोग आणि हवाय त्या ठिकाणि व्यवस्थित झाला नसल्याने कि काय..? आजघडीला नागरिकंना पाणी टंचाईचा सामान करण्याची वेळ आली आहे.
हि बाब लक्षात घेता तात्काळ बंद पडलेले बोअर आणि मोटारपंप दुरुस्त करून नागरिकांची पाण्यासाठी होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल मादसवार यांनी एका निवेदनाद्वारे नागरपंचायत प्रशासनाकडे केली आहे. निवेदन दिल्याच्या दुसऱ्या दिवसापासून अनेक प्रभागात नादुरुस्त बोअर, मोटारपंप दुरुस्तीच्या कामना वेग आला आहे. असे असले तरी शहरात किती बोअर चालू, किती बोअर बंद आहेत याबाबत माहिती मागविली आहे. १९ कोटीच्या नळयोजनेचे काम पूर्ण होईपर्यंत शहरातील प्रत्येक वॉर्डाच्या नागरिकांना पाणी टंचाई भासणार नाही याकडे प्रशासनाने कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे. आज घडीला पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरु असून, यामध्ये मोठी अनियमितता होताना दिसून येत असल्याचे मत निवेदनकर्ते अनिल मादसवार यांनी म्हंटले आहे.
चौकट
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान प्रकल्पातुन हिमायतनगर शहरातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी पोहचविन्यासाठी नळयोजनेचे काम मुरली बंधाऱ्यावरून सुरु आहे. या योजने अंतर्गत शहरात ४ ठिकाणी मोठ्या पाण्याच्या जलकुंभ उभारण्याचे काम चालू आहे. यामध्ये ३.६० लक्ष लिटर क्षमतेची एक पाण्याची टाकी असून, शहरातील बोरगडी रोडवरील बाजार ओट्याच्या शेजारी केली जात आहे. ५.०० लक्ष लिटर क्षमतेची एक टाकी किनवट – नांदेड रोडवर बंडेवार यांच्या ले-आउट मधील न.पं.च्या जागेत, तर ६० हजार लिटर क्षमतेची फुलेनगर येथे आणि ५० हजार लिटर क्षमतेची पाणी टाकी दारुल उल्लूम मोहम्मदिया भोकर रोड येथे उभारण्यात येत आहे. असे असले तरी शहरातील वॉर्ड क्रमांक १, वार्ड क्रमांक १०, वार्ड क्रमांक ११ व वार्ड क्रमांक १२ येथील नागरिकांना नगरपंचायत शेजारील पाण्याच्या टाकीद्वारे पाणी मिळणे शकय नाही. त्यामुळे रुख्मिनी नगर, श्री परमेश्वर मंदिर परिसर, परमेश्वर गल्ली, कन्या शाळा मागील परिसर, दत्तनगर, प्रताप गल्ली, काझी मोहल्ला, शंकरनगर, सह अन्य भागात नागरिकांना पीण्याचे पाणी कायमस्वरूपी उपलब्ध व्हावे म्हणून आणखी एक भव्य पाण्याची टाकी निर्माण करणे गरजेचे असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते अनिल मादसवार यांनी व्यक्त केले आहे.
