
मनसे करणार वरोरा नगराध्यक्ष यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन..
वरोरा नगरपरिषद चे अध्यक्ष अहेतेशाम अली यांच्या अभ्यंकर वार्डातील घरासमोर व लोकमान्य शाळेच्या कंपाउंड़ भिंतीला लागून असलेला रस्ता च हरवला असल्याची धक्कादायक बाब समोर आली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष वैभव डहाने यांच्या नेतृत्वात वरोरा नगरपरिषद चे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन सदर रस्ता त्वरित सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू करण्यात यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला.
वरोरा शहरात सर्वत्र सिमेंट चे रस्ते बनविण्याचे काम दिसत असताना नगराध्यक्ष यांच्या घरासमोरील रस्ताच गायब होणे हे वरोरा शहरातील जनतेला संभ्रमात टाकणारी गोष्ट असून नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांनी याकडे का दुर्लक्ष केले? की त्यांच्या मनात हा रस्ताच अदृश्य ठेवायचा आहे? हे न कळणारी बाब असून शहराचा प्रथम नागरिक जर अशा प्रकारचे काम करतील तर बाकी नगरसेवक यांच्या कडून जनतेने काय अपेक्षा ठेवायच्या हा प्रश्न मनसे पदाधिकारी यांनी नगरपरिषदचे मुख्याधिकारी यांना विचारून हा रस्ता जर येत्या दहा दिवसात दिसला नाही तर नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांच्या घरासमोर मनसे स्टाईल ठिय्या आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले जाईल असा इशारा देण्यात आला. याप्रसंगी मनसे तालुका अध्यक्ष वैभव डहाने,शहर अध्यक्ष राहुल लोणारे, तालुका सचिव कल्पक ढोरे, तालुका उपाध्यक्ष प्रशांत बदकी, मनवीसे जिल्हा उपाध्यक्ष मुज्जमील शेख, राहुल खारकर, प्रसिद्धी प्रमुख विक्की येरणे, शरद पुरी इत्यादींची उपस्थिती होती
