वाणाच्या रुपात वाटले रोपटे,तळवेकर कुटुंबाचा अभिनव उपक्रम

वरोरा – तीळसंक्रांतीचा सण सध्या सुरू आहे आणि प्रत्येक महीला ऐकमेकांना वाण म्हणून गृहपयोगी वस्तू देतात पण वरोरा च्या श्रीमती सुहानी श्रीकांत तळवेकर यांनी कोरोना मध्ये सर्वात जास्त कमतरता होती ती ऑक्सिजन ची आणि ही कमतरता सध्या ग्लोबल वार्मिग मुळे झाली या ऑक्सिजन च्या कमतरतेची मुळे‌कित्येक लोक कोरोना मध्ये मृत झाले त्याच‌औचित्य साधून त्यांनी या वर्षी वाण म्हणून‌ प्रत्येक महिलेला झाड दिले त्यांनी जवळपास ५०-६० महिलांने वाणस्वरूपात झाडाचे रोप दिले त्यांचे या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतूक होत आहे