
शहर प्रतिनिधी:राहुल झाडे ,वरोरा
मागील कित्येक दिवसापासून गरीब घरकुल लाभार्थ्यांना दिलासा मिळावा यासाठी रेतींतस्करी रोखून जप्त रेतीचा लिलाव करून गरिबांना रेती उपलब्ध करून दिलासा द्या यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुकाध्यक्ष वैभव डहाणे यांनी वारंवार निवेदन दिले ,आंदोलन केले .परंतु रेती तस्करांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.त्यामुळे जनसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न अर्धवट राहिले आहेत.रेती तस्करांवर कारवाई करण्यासाठी वारंवार निवेदने देऊन ही जेव्हा कारवाई होत नाही ”त्यामुळे सब सेट है” च्या चर्चा सामान्य नागरिकांमध्ये आहेत.
या पुढे जर रेती तस्करी थांबत नसेल तर आत्मदहन करू असा इशारा मनसे चे तालुकाध्यक्ष वैभव डहाणे यांनी दिला आहे.
